वसई- वसईतील कार्डिनल ग्रेशस रुग्णालयातील डॉक्टर डेलिसा परेरा (३९) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. डेलिसा यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पतीचे अनैतिक संबंध होते आणि त्यावरून पती शारिरिक आणि मानसिक छळ करत असल्याचे म्हटले होते. याप्रकरणी बुधवारी रात्री वसई पोलिसांनी डेलिसा परेरा यांचे पती रॉयल परेरा याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
डॉ डेलिसा परेरा (३९) या पापडीच्या सोनारभाट येथे पती रॉयल परेरा आणि १२ वर्षांच्या मुलीसह रहात होत्या. त्या वसईच्या बंगली येथील प्रसिध्द कार्डिनल ग्रेशस रुग्णालयात फिजिओथेरेपिस्ट म्हणून कार्यरत होत्या. सोमवारी संध्याकाळी त्यांनी पापडी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्या पापडी येथील चर्च मध्ये मिस्सा (प्रार्थना) कऱण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पापडी चर्चच्या फादरांना भेटून एक लिफाफा दिला होता. त्यामध्ये एक चिठ्ठी होती. फादरांनी ही चिठ्ठी मयत डॉ डेलिसा परेरा यांच्या आईला दिली. या चिठ्ठीतून हा खुलासा झाला.
हेही वाचा >>>दुबईत सोन्याची कंपनी सुरू करण्याची थाप; त्रिकुटाने घातला ४५ लाखांचा गंडा
चिठ्ठित काय लिहिले होते?
डेलिसा यांचे पती रॉयल परेरा याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यावरून तो डॉ डेलिसा यांना शारिरिक आणि मानसिक त्रास देत होता. २६ नोव्हेंबर २०२४ ते ६ जानेवारी २०२५ या कालावधीत रॉयलने शारिरीक आणि मानसिक त्रास दिल्याचे या चिठ्ठीत डेलिसाने म्हटले होते. याप्रकऱणी मयत डेलिसा यांच्या आईने तक्रार दिल्यानंतर वसई पोलिसांनी आरोपी रॉयल याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ११५ (२) ३५१ (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येपूर्वी डॉ डेेलिसा यांनी लिहिेलल्या चिठ्ठीतून हा प्रकार उधडकीस आतक्रारला आहे. आम्ही आरोपी रॉयल परेरा याला अटक केली आहे. अशी माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण घाडिगावकर यांनी दिली.
हेही वाचा >>>आयकर विभागाचा चालक बनला तोतया आयुक्त, नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना कोट्यवधींचा गंडा
मिसेस इंडियाची स्पर्धेतही यश मिळवले होते
डॉ डेलिस या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या होत्या.त्या फिटनेस प्रेमी होत्या तसेच विविध स्पर्धांमध्ये भाग घेत असायच्या. त्यांनी विवाहित महिलांसाठी असणाऱ्या मिसेस इंडिया स्पर्धेत भाग घेऊन अंतिम फेरित स्थान मिळवले होते.
सहकाऱ्यांना दुःख अनावर
‘डॉ डेलिस या मनमिळावू होत्या. रुग्णांध्ये त्या लोकप्रिय होत्या. त्याचा असा मृत्यू चटका देणारा आहे’, अशी प्रतिक्रिया डॉ डेलिस यांच्या सहकारी डॉ दिपाली पवार यांनी दिली. ‘डॉ डेलिस या खूप प्रेमळ होत्या. ज्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली तेव्हा त्या नेहमीप्रमाणे कामावर होत्या. सर्व रुग्ण त्यांनी तपासले. रुग्णालयात नवीन यंत्र येणार होते त्याची देखील त्यांनी चौकशी केली’ असे कार्डिनल ग्रेशस रुग्णालयाच्या परिचारिका अस्मिता पाटील यांनी सांगितले. त्याच्या जाण्याचा धक्का आम्ही सहन करू शकत नाही, असे डॉ डेलीस यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.