वसई: वर्सोवा खाडीजवळ सूर्या प्रकल्पाच्या कामादरम्यान घडलेल्या दुर्घटनेची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. यात अडकून पडलेल्या राकेश कुमार चालकांचा शोध घेण्यासाठी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२९ मे रोजी रात्री ९.३० वाजता वर्सोवा खाडी पुलाजवळ एल अँड टी कंपनी यांच्या मार्फत सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या बोगद्याचे काम सुरू असताना भूस्खलन होऊन दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखाली पोकलेनसह चालक राकेश कुमार यादव हा अडकून पडला आहे. याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात ठेकेदार यांच्यावर गुन्हा ही दाखल झाला आहे. परंतु १७ दिवस उलटून गेले तरी अजूनही त्याचा शोध लागला नाही.

हेही वाचा – वसई: बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या बोटींवर कारवाई सुरू; करंजा येथील ७ बोटींवर मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई

शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी दौरा करून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. यावेळी त्यांनी घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी असून त्यात अडकून पडलेल्या चालकाचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफचे प्रयत्न सुरू होते. आता त्यांच्यासह आर्मी, नेव्ही, कोस्टल गार्ड यासह इतर स्थानिक प्रशासकीय यंत्रणा नेमण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

हेही वाचा – महामार्गावरील सिमेंट काँक्रीटच्या निकृष्ट कामाची पोलिसांनी केली पोलखोल

शोध कार्यात निष्काळजीपणा

१७ दिवस झाले तरीही अजूनही काँक्रिट भिंत व ढिगाऱ्याखाली अडकलेल्या राकेश कुमार यादव याचा शोध लागला नाही. या शोध कार्यात निष्काळजीपणा दाखविला जात असल्याचा आरोप राकेश यांच्या कुटुंबियांनी केला आहे. मागील चार दिवसांपासून बचाव कार्य थांबविण्यात आले होते. आता मुख्यमंत्री येणार म्हणून पुन्हा शोध कार्य सुरू केले आहे, असे राकेश यांच्या वडिलांनी सांगितले आहे. लवकरात लवकर माझ्या मुलाचा शोध घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai eknath shinde inspects the versova surya project accident rescue operations resumed ssb