वसई: वसई विधानसभा मतदारसंघात अटीतटीच्या तिरंगी लढतीत राजकारणात नवख्या असलेल्या स्नेहा दुबे-पंडित यांनी वसईच्या राजकारणात मागील तीन दशकाहून अधिक काळ आमदार राहिलेल्या हितेंद्र ठाकूर यांचा पराभव करून त्या जायंट किलर ठरल्या आहेत. वसईत भाजपच्या स्नेहा दुबे- पंडित यांनी ७७ हजार ५५३ मते मिळवून ३ हजार १५३ मतांनी ठाकूर यांचा पराभव केला आहे.
वसई विधानसभा मतदारसंघात ३५४ मतदान केंद्रावर बुधवारी मतदान झाले होते. वसईतून बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, महायुतीच्या स्नेहा दुबे- पंडित, महाविकास आघाडीचे विजय पाटील, बसपाचे विनोद तांबे व ३ अपक्ष उमेदवार असे सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. विशेषतः या मतदारसंघात हितेंद्र ठाकूर, विजय पाटील आणि स्नेहा दुबे यांच्यात तिरंगी लढत एकदम अटीतटीची झाल्याचे शनिवारी झालेल्या मतमोजणीतून स्पष्ट झाले.
वसईच्या संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. साधारणतः साडेनऊच्या सुमारास पहिल्या फेरीतील मतमोजणीची घोषणा झाली. त्यानुसार विजय पाटील यांना २४०३, स्नेहा दुबे यांना २७२२ आणि हितेंद्र ठाकूर यांना ३५११ इतकी मतं मिळाली होती. ठाकूर पहिल्या फेरीत ७८९ मतांनी पुढे असल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा >>> बहुजन विकास आघाडीचे पानिपत तिन्ही उमेदवार पराभूत, ठाकूरांचे साम्राज्य खालसा
पहिल्या फेरी पासून ते सहाव्या फेरीपर्यंत हितेंद्र ठाकूर आघाडीवर होते त्यानंतर सातव्या फेरीनंतर काँग्रेसच्या विजय पाटील यांनी आघाडी घेतली. ती आघाडी ११ व्या फेरीपर्यंत होती. मात्र बाराव्या फेरीनंतर भाजपच्या स्नेहा दुबे आघाडीवर आल्या शेवटच्या अखेरच्या २६ व्या फेरीपर्यंत त्यांनी आघाडी कायम ठेवत हितेंद्र ठाकूर यांना पिछाडीवर ठेवले. अखेरच्या फेरीनंतर ३ हजार १५३ मताधिक्याने विजय संपादन केला.
हितेंद्र ठाकूरांना एकूण ७४ हजार ४०० मते
हितेंद्र ठाकूरांना एकूण ७४ हजार ४०० मते मिळाली. शिवसेना-भाजपा महायुतीच्या स्नेहा दुबे ७७ हजार ५५३ महाविकास आघाडीचे विजय पाटील यांना ६२३२४ मते मिळाली. बसपाचे विनोद तांबे यांना ७४३, अपक्ष राजेंद्र ढगे ६३४, गॉडफ्री अल्मेडा ७६८, प्रल्हाद राणा ४५२आणि नोटा’ला २३४६ मते पडली.
हितेंद्र ठाकूर यांचा बुरुज ढासळला
बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूरांनी वसईत यापूर्वी १९९९, १९९५, १९९९, २००४ ,२०१४ आणि २०१९ अशा सहा वेळा विधानसभेच्या निवडणुका लढल्या आणि त्या जिंकल्याही. त्यांनंतर ठाकूर यांनी यापुढे निवडणूक न लढण्याचा घेतला होता. मात्र राजकीय परिस्थिती बदलल्याने त्यांनी पुन्हा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेत सातव्यांदा निवडणूक लढली. हितेंद्र ठाकूर यांनी आमदारकीच्या काळात तसेच महापालिकेच्या माध्यमांतून आतापर्यंत केलेल्या विकासकामांचा पद्धतशीर प्रचार केला होता.
विजय पाटील पुन्हा कॉंग्रेस पक्षात गेले आणि त्यांनी महाविकास आघाडीतर्फे तिकिट मिळवून तेही ठाकूर यांच्या विरुद्ध दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांनी सुद्धा यावेळी निवडणुकीत जोरदार लढत दिली.
मात्र महायुती मधून ऐनवेळी स्नेहा दुबे पंडित यांना भाजप पक्षात उमेदवारी देण्यात आली होती. चाळीस वर्षानंतर वसईत महिला उमेदवार म्हणून स्नेहा दुबे यांच्याकडे पाहिले जात होते.
याशिवाय महायुती सरकारच्या काळात लाडकी बहीण योजना यासह अन्य योजनांचा केलेला प्रचार याशिवाय श्रमजीवी संघटनेचे पाठबळ यामुळे भाजपने वसईत बाजी मारली.
महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष
मतमोजणी सुरू झाल्यानंतर एकापाठोपाठ एक असे निकाल जाहीर होत होते. दुपारी दोन वाजेपर्यंत सर्वत्र शांतता होती. मात्र अखेरच्या फेरीचा निकाल येताच शिवसेना भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला. मोठ्या संख्येने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण सुरू केली होती.तर बेंजो व ढोल ताशा तालावर ठेका धरला होता. काही उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत विजयोत्सव साजरा केला.
प्रतिक्रिया
वसईत परिवर्तन घडले आहे. पूर्ण निवडणूक प्रचारात आम्ही कुणावर ही टीका केली नाही. भूतकाळातील भूत काढण्यापेक्षा आम्ही भविष्यात काय करणार यावर लक्ष केंद्रित केले होते. वसईतील जनतेने आम्हाला विजयी केले आहे. आता आम्ही वसईच्या विकासासाठी काम करणार आहोत. :- स्नेहा दुबे-पंडित ( विजयी उमेदवार, भाजपा वसई )