वसई – वसईतील प्रसिद्ध असलेल्या चाफेकर रुग्णालयाचे प्रमुख डॉ प्रशांत चाफेकर यांचे शुक्रवारी सकाळी कर्करोगाने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. मागील २ वर्षांपासून ते यकृताच्या कर्करोगाशी झुंज देत होते.

हेही वाचा – राहुल गांधींना जीवे मारण्याचा भाजपाचा मानस – नाना पटोले

हेही वाचा – गांधींना विरोध ही नथुराम गोडसेची प्रवृत्ती – थोरात

वसईच्या अंबाडी रोड येथे त्यांचे चाफेकर रुग्णालय प्रसिद्ध होते. निष्णात आणि अनुभवी डॉक्टर म्हणून ते वसईत मागील अनेक वर्षांपासून वैद्यकीय सेवा देत होते. त्यांना यकृताच्या कर्करोगाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी त्यांचे निधन झाले. अष्टपैलू व्यक्तिमत्व, आनंदी स्वभाव आणि सामाजिक भान असलेले डॉक्टर म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनाने वसईतील वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. प्रिया चाफेकर, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. संध्याकाळी दिवाणमान येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.