वसई – वसईत राहणार्‍या एका तरुणीला घरात शिरून मारहाण केल्याची घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या हल्ल्यात तरुणी जखमी झाली आहे. वालीव पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “पवार-मोदींच्या भेटीने आघाडीवर परिणाम नाही”, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा दावा; म्हणाले…

हेही वाचा – वडेट्टीवारांची ‘पदोन्नती’ पटोलेंसाठी धोक्याची घंटा? प्रदेशाध्यक्षपद मराठवाड्याकडे जाणार असल्याची चर्चा

पीडित तरुणी १९ वर्षांची असून ती वसईतील एका महाविद्यालयात शिकतेय. मंगळवारी दुपारी ती घरात एकटी असताना ही घटना घडली. तिने वालीव पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या परिचयाचा एक तरुण तिच्या घरात शिरला. त्याने कपड्याने तिचा गळा आवळून तिला मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिला मारहाण केली. तिला जखमी अवस्थेत घरात बंद करून पळून गेला. पीडित मुलीने मदतीसाठी धावा केल्यानंतर शेजारील महिलांनी तिची सुटका केली. तिच्यावर रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. तिने दिलेल्या तक्रारीवरून वसईत राहणार्‍या आमन मदेशिया याच्या विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कलम ३०७, तसेच ३९४, ४५२, ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी दिली.