लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी
वसई : वसई विरार महापालिकेचे उपायुक्त अजित मुठे यांच्यावर भूमाफियांनी हल्ला केला. बुधवारी संध्याकाळी नायगाव पूर्वेच्या पोमण शिलोत्तर भागात ही घटना घडली.
वसई विरार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख असलेले उपायुक्त अजित मुठे हे बुधवारी दुपारी आपल्या पथकासह नायगाव पूर्वेच्या पोमण शिलोत्तर येथे कारवाई करण्यासाठी गेले होते. या ठिकाणी भूमाफियांनी बेकायदेशीररित्या अनधिकृत बांधकाम केले होते. ही कारवाई करत असताना भूमाफियांनी अचानक मुठे यांच्यावर हल्ला चढवला. यात मुठे यांना किरकोळ दुखापत झाली. नंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
आणखी वाचा-भाईंदरमध्ये पोलिसांवर फेकले उकळते पाणी, पाच पोलीस जखमी
या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तो पर्यत मुठे यांनी भूमाफियांचे अकरा हजार चौरस किलोमीटर अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले होते.