वसई : नायगाव पूर्वेच्या नायगाव जूचंद्र रस्त्यावरील जुन्या महावितरण कार्यालया जवळ चारचाकी आणि ऑटोरिक्षाची जोरदार धडक लागून भीषण अपघात झाला आहे. हा अपघात बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडला यात रिक्षाचालक संजय बाबूलाल यादव (३८) हा जागीच ठार झाला.तर दोन प्रवासी व कारचालक असे तीन जण जखमी झाले आहेत. नायगाव पूर्वेच्या भागातून जूचंद्र नायगाव रस्ता गेला आहे. नायगाव उड्डाणपूल खुला झाल्यापासून पासून या मार्गावर वाहनांची वर्दळ प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे भरधाव वेगाने ही वाहने मार्गावर चालू लागली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : नालासोपाऱ्यात ४१ अनधिकृत इमारतींवर अखेर कारवाई सुरू; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ; नागरिकांचा आक्रोश

गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास एम एच ४८ सीसी ०१८० या क्रमांकाची चारचाकी घेऊन चालक नायगाव मार्गे भरधाव वेगाने जात असताना एम एच ०४ एच झेड १६५७ या ऑटोरिक्षाला जोराची धडक लागून भीषण अपघात घडला आहे. या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. संजय बाबू यादव(३८) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे.तर त्याच्या मागे बसलेले अक्षय कदम आणि सागर सावंत हे दोन प्रवासी जखमी झाले आहेत. तर कारचालक अमित पवार (३२) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी कारचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.