वसई: बदलापूर येथील एका शाळेत मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार घटनेचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. अशा घटना शाळेत व महाविद्यालयात घडू नये यासाठी नायगाव पोलिसांनी बुधवारी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या विद्यालयातील मुख्याध्यापकांची बैठक घेतली. यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेविषयीच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत.

बदलापूर येथील शाळेत मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार घटनेमुळे पुन्हा एकदा शालेय सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शालेय स्तरावरून उपाययोजना होणे गरजेचे आहे. यासाठी नायगाव पोलिसांनी मुख्याध्यापक यांची तातडीने बैठक घेतली. यात
सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, मुलींच्या स्वच्छतागृहाची साफसफाई करण्याकरिता महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, विशाखा समिती स्थापन करणे,  शाळेतील कर्मचारी यांचे चरित्र पडताळणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच शाळेतील बसवरील वाहक व चालक यांचेही चारित्र्य पडताळणी करण्याबाबत सूचना देऊन शक्यतो महिला वाहकाची नेमणूक करावी, तक्रार पेटी ठेवणे, मुलांचे समुपदेशन करणे अशा सूचना नायगाव पोलिसांनी केल्या आहेत.

Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
hundreds of devotees going to velankanni got stuck at vasai station due to train late for 10 hours
वेलंकनीला जाणारे शेकडो भाविक वसई स्थानकात अडकले; १० तासांपासून ट्रेनच्या प्रतिक्षेत
naigaon school rape marathi news
बदलापूरच्या घटनेची नायगावमध्ये पुनरावृत्ती, ७ वर्षीय चिमुकलीवर शाळेच्या कँटीन चालकाकडून लैंगिक अत्याचार
Missing petrol pump owner, petrol pump owner murder,
वसई : बेपत्ता पेट्रोलपंप मालकाची हत्या, चालक फरार
Bloody conflict in Nalasopara 11 people arrested
नालासोपाऱ्यातील रक्तरंजित संघर्ष, ११ जणांना अटक
hitendra thakur property tax survey vasai marathi news
वसई: मालमत्ताकराचे सर्वेक्षण करणार्‍या एजन्सीकडून लूट, हितेंद्र ठाकूरांकडून एजन्सी काढून टाकण्याचे निर्देश
JP Singh arrest, Praveen Dhule murder case, Nalasopara, land mafia, Central Crime Branch, absconding accused
प्रवीण धुळे हत्या प्रकरण फरार आरोपीला १६ वर्षानंतर अटक

हेही वाचा – Vasai Crime News : यादवेश विकास शाळेतील बलात्कार प्रकरण, मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल

सहायक पोलीस आयुक्त नवनाथ घोगरे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, पोलीस निरीक्षक सागर टिळेकर, मंगेश अंधारे, सहायक पोलीस निरीक्षक बलराम पालकर, पोलीस हवालदार प्रकाश आवारे यासह ३५ ते ४० शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

हेही वाचा – वसई : शाळा महाविद्यालयांची उदासीनता, तक्रार पेट्या बसविण्याचा निर्णय कागदावरच

बदलापूर सारखी दुर्घटना अन्य शाळेत घडू नये यासाठी नायगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या शाळांमधील मुख्याध्यापक यांची बैठक घेतली. मुलांच्या सुरक्षिततेसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या आहेत. – रमेश भामे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक नायगाव पोलीस ठाणे</p>