वसई : नवोदीत अभिनेंत्रींच्या अश्लील चित्रिकरण प्रकरणातील म्होरक्‍या नियाज अली याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणात आणखी ५ तरुणी तक्रार देण्यासाठी समोर आल्या आहेत. सिनेमात अभिनेत्री बनण्यासाठी आलेल्या तरुणींचे अश्लील चित्रिकरण करुन ते कोठा नावाच्या ॲपवर प्रसारीत केले जात असल्याचे हे प्रकरण डिसेंबर महिन्यात उघडकीस आले होते.

सिनेमात काम करण्यासाठी देशाच्या विविध भागातून तरुण तरुणी मुंबईत येत असतात. सध्या विविध ॲपद्वारे प्रसारीत होणार्‍या शॉर्ट फिल्म आणि बेवसिरिजमध्ये काम करण्यासाठी हे तरुण तरुणी प्रयत्न करत असतात. अशा तरुणींना हेरून त्यांचे लैंगिक शोषण केले जात असल्याचे एक प्रकरण मागील वर्षी डिसेंबर महिन्यात गुन्हे शाखेने उघडकीस आणले होते. वसईत राहणार्‍या १८ वर्षीय तरुणीला आरोपींनी बेवसिरीजमध्ये काम देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर तिला ऑडीशन देण्यासाठी अर्नाळा येथील एका रिसॉर्टमध्ये बालावले होते. तिथे तिला काही दृश्ये चित्रित करायची आहेत असे सांगून तिला फसवून अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले.

Case against tuition teacher, tuition teacher pune,
मुलीशी अश्लील कृत्य प्रकरणी शिकवणी चालकाविरुद्ध गुन्हा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Request to the court to quash the rape charges against the boy by the girl in Nagpur news
मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…
sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
teacher lost 20 lakh rupees share market
शिक्षकाला वीस लाखांचा गंडा, सुरतचे तीन आरोपी गजाआड; बुलढाणा सायबरची कारवाई

हेही वाचा : प्रदूषण रोखण्यासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार;पालघरमध्ये एलएनजी बसेस धावणार

ही दृश्ये केवळ ऑडीशनचा भाग असून तिचा कुठे वापर केला जात नाही. सिनेसृष्टीत असं करावं लागतं असं तिला सांगितलं. मात्र तिची दृश्ये ‘कोठा’ नावाच्या अश्लील ॲपवर प्रसारीत करण्यात आली होती. तिने अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनयिमाच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण पुढील तपासासाठी गुन्हे शाखा ३ कडे वर्ग करण्यात आले होते. याप्रकरणी तांत्रिक तपास करून अनुजकुमार जैस्वाल (३०), सर्जू कुमार विश्वकर्मा (२५) तसेच ३३ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली होती.

आणखी ५ तरुणी पुढे, मुख्य आरोपी अटकेत

या प्रकरणाता पोलिसांनी तपास केला असता आणखी ५ तरुणींची अशाप्रकारे फसवणूक करून त्यांच्या अश्लील चित्रफिती कोठा ॲपवर प्रसारीत केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या ५ तरुणींचे जबाब घेतले असून या प्रकरणात त्यांना तक्रारदार तसेच साक्षीदार बनवले आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणातील मुख्य आरोपी नियाज अली याला अटक केली आहे.

हेही वाचा : वसई : उत्कृष्ट तपास करणार्‍या पोलिसांचा गौरव; ‘सिरियल रेपिस्टची अटक’, ‘हत्येचा उलगडा’ ठरला सर्वोत्तम तपास

कोठा ॲप ५ महिन्यांतच बंद

आऱोपींच्या कार्यपद्धतीबाबत माहिती देताना गुन्हे शाखा ३ चे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी सांगितले की, आरोपींनी कोठा नावाचे ॲप बनवले होते. ते गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येत होते. ३०० ते ४०० रुपये देऊन त्याचे सबस्क्रिप्शन द्यायये. अश्लील चित्रफितींना असणारी मागणी लक्षात घेऊन या ॲपची निर्मिती करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यापासून हे कोठा नावाचे ॲप सुरू केले होते. मात्र नोव्हेंबर महिन्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपास करून आरोपींना अटक केली आणि ॲप बंद केले. या प्रकरणी दीड हजार पानांचे दोषारोपपत्र तयार करण्यात आले आहे.

Story img Loader