वसई: वसई विरार महापालिकेच्या दोन अभियंत्यांच्या वसईतील पब मधील नृत्य प्रकरणाला आता वेगळी कलाटणी मिळाली आहे. या मेजवानीत असलेल्या ३ तरुणींनी या चित्रफीतीत फेरफार करून बदनामी केल्याची तक्रार केली आहे. या तक्रारीवरून वसई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> वसई भाईंदर रोरो सेवेच्या रस्त्याला पुरातत्व खात्याचा खो, वर्दळीमुळे ऐतिहासिक वसई किल्ल्याला धोका असल्याची तक्रार

वसई विरार महापालिकेचे पेल्हार प्रभागातील अभियंता भीम रेड्डी आणि चंदनसार प्रभागातील अभियंता मिलिंद शिरसाट या दोन अभियंत्यांची एक चित्रफित नुकतीच समाजमाध्यमावर व्हायरल झाली होती. या चित्रफितीमध्ये हे दोन अभियंते काही तरुणींसह वसईतील एका पब मध्ये नृत्य करत असताना दिसून आले होते. ही चित्रफित समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती. या चित्रफितीमध्ये तरुणींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्यात आले होते. यामुळे २५ वर्षीय तरुणी आणि तिच्या दोन मैत्रिणींनी वसई पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

हेही वाचा >>> वहिनीची हत्या करणार्‍या दिराला जन्मठेप; वसई सत्र न्यायालयाचा निकाल

आम्ही काही महिन्यांपूर्वी वसईतील पंखा फास्ट या पब आमच्या मित्रांसोबत नृत्य करत असताना अज्ञात व्यक्तींनी आमचे चोरून चित्रीकरण केले. त्या चित्रफीती मध्ये फेरफार करून आमची समाजमाध्यमांवर बदनामी करण्यात आली आहे, अशी तक्रार २५ वर्षीय तरुणीने वसई पोलीस ठाण्यात केली होती. त्या तक्रारीवरून वसई पोलीस ठाण्याने अज्ञात व्यक्तिविरोधात ३ तरुणींची बदनामी केल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या नृत्य प्रकरणी वसई विरार महापालिकेने यापूर्वीच दोन्ही अभियंत्याना बडतर्फ केले आहे. भूमाफियांसोबत मेजवानी आणि सार्वजनिक ठिकाणी नृत्य करून पालिकेची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे.