वसई : बनावट कागदपत्रांच्या आधारे ५५ अनधिकृत इमारत प्रकरणात विरार पोलिसांनी तब्बल साडेतीन हजार पानांचे दोषारोपपत्र (चार्जशीट) वसई सत्र न्यायालयात सादर केले आहे. या दोषारोपपत्रात एका गुन्ह्यात ८ आरोपी असून शंभरहून अधिक जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. अनधिकृत बँकांना कर्ज देणाऱ्या १३ वित्तीय संस्था संशयाच्या भोवऱ्यात आहेत. या घोटाळ्यात वसई विरार शहरात ११७ अनधिकृत इमारती तयार करण्यात आल्या असून १३ गुन्हे दाखल आहेत. त्यात ७८ जणांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.

ऑगस्ट महिन्यात विरार पोलिसांनी अनधिकृत इमारत घोटाळा उघडकीस आणला होता. महापालिकेसह विविध शासकीय विभागांचे बनावट सही, शिक्के आणि लेटरहेड तयार करून त्याआधारे बनावट बांधकाम परवानगी तयार करून अनधिकृत इमारती बांधल्या होत्या. विरार पोलिसांनी सुरुवातीला ५५ अनधिकृत इमारती बांधल्याचे उघडकीस आणले होते. नंतर तपासामध्ये ११७ अनधिकृत इमारती बांधल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी विरार पोलिसांनी गुरूवारी वसईच्या सत्र न्यायायालयात दोषारोपपत्र (चार्जशिट) दाखल केले आहे.

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी
government contractor killed over two crores extortion money
दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून; ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक; मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
fake graduation certificate pune municipal corporation
पुणे महापालिकेच्या उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल; बनावट पदवी सेवा पुस्तिकेत जोडून महापालिकेची फसवणूक
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला

हेही वाचा : नवरात्री विशेष: विरारच्या मारंबलपाडा येथील श्री सोनुबाई भवानी मंदिर

हे दोषारोपपत्र ३ हजार ४२० पानांचे आहे. त्यामध्ये एकूण ८ आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी १ आरोपी फरार आहे. देवेंद्र माजी नावाचा आरोपी गंभीर आजारी असल्याने त्याला अटक करण्यात आलेली नाही, तर ६ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली.

कोणावर काय आरोप?

विरार पोलिसांनी रुंद्राश या अनधिकृत इमारतप्रकरणी दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात एकूण ६ प्रमुख आरोपी आहेत. त्यात रुंद्राश रियल्टर्सचा विकासक जमीन मालक दिलीप बेनवंशी, त्याचा भागीदार प्रशांत पाटील, मयूर एंटरप्रायझेसचा मच्छिंद्र व्हनमाने, फिनिक्स कॉर्पोरेशनचा मालक दिलीप अडखळे हे प्रमुख आरोपी आहेत. याशिवाय देवेंद्र मांझी आणि राजेश नाईक हे अन्य आरोपी आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासात प्रमोद झोरे नावाच्या आणखी एका आरोपीचे नाव समोर आले आहे.

हेही वाचा : वसई : तरुणींना प्रेमजाळात ओढून बलात्कार करणारा डॉक्टर गजाआड, आतापर्यंत ३ गुन्हे दाखल

त्याच्या खात्यात ही रक्कम जमा केली जात होती. त्याच्या खात्यातील बँकेचे तपशिल पोलिसांनी मिळवले आहे. त्याच्याकडे १ कोटींहून अधिक रक्कम जमा झाली होती. त्याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. देवेंद्र माझी हा आरोपी बनावट कागदपत्रे बनवत होता. हुबेहूब सही करण्याचा त्याचा हातखंडा होता. सध्या त्याला गँगरीनचा गंभीर आजार झाला असल्याने त्याला अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

१३ वित्तिय संस्था संशयास्पद

विरार मधील रुद्रांश या अनधिकृत इमारतीला १३ वित्तिय संस्थाकडून कर्जे देण्यात आली आहे. इमारत अनधिकृत असल्याचे माहित असूनही त्यांनी कर्जे दिली होती. त्यामुळे या खासगी वित्तीय संस्थांचे व्यवहार संशयास्पद असून त्यांना देखील आरोपी बनविले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा : विरार मध्ये आणखी तीन विकासकांवर गुन्हे दाखल; बनावट बांधकाम परवानगी बनवून उभारल्या अनधिकृत इमारती

काय आहे हा घोटाळा

आरोपींनी बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र, नकाशा, दस्त नोंदणी या सगळ्या बनावट कागदपत्रांच्या आधारे अनधिकृत इमारती बांधल्या होत्या. या आरोपींकडे अनेक बनावट कागदपत्रे तयार करणारी यंत्रसामग्री सापडली. एकूण ११९ शिक्के सापडले त्यात एमएमआरडीए, पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, सिडको, दुय्यम निबंधक, नगर रचना संचालक, सरपंच, बँक व्यवस्थापक, डॉक्टर, वकील, वास्तुविषारद आदींच्या विविध ११९ शिक्क्यांचा समावेश होता. याशिवाय पालिकेचे ६०० लेटरपॅड, सिडकोचे ५०० लेटरपॅड तसेच बनावट इमारतींच्या कागदपत्रांच्या ५५ फाईल्स आढळून आल्या. सध्या या प्रकरणात विरार पोलीस ठाण्याशिवाय अन्य पोलीस ठाण्यात १२ असे एकूण १३ गुन्हे दाखल आहेत. त्यात प्रत्येक गुन्ह्यात मुख्य ४ आरोपी धरून ७८ जणांवर गुन्हे दाखल आहेत. एकूण ११७ अनधिकृत इमारती बांधल्याचे तपासात समोर आले आहे.