अर्नाळा नवापूर येथील सेव्हन सी रिसॉर्ट मध्ये ठाण्यातील शिवसैनिकाचा मारहाणीत मृत्यू झाला आणि नवीन वातावरण पेटले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने रिसॉर्ट जमीनदोस्त करण्यात आले. ही कारवाई सूडबुध्दीने झाल्याचा आरोप होत आहे. यामुळे स्थानिक उध्दवस्त झाले. पण या कारवाईमुळे स्थानिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ठाण्यातील एक गट अर्नाळा नवापूर येथील सी सेव्हन रिसॉर्ट मध्ये सहलीसाठी आला. सर्व काही आलबेल सुरू होतं. मौजमजा सुरू होती. पण एका स्थानिक रिक्षावाल्याने या गटातील एकाला धडक दिली. वाद वाढला. मग रिक्षाचालकाने गावातील काही लोकं आणि रिसॉर्टच्या कर्मचारी गोळा केले आणि या गटला मारहाण केली.परिणामी या गटातील एक मिलिंद मोरे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. प्रकरण एवढ्यावर थांबले असते. पण मिलिंद मोरे हे ठरले ठाण्याचे शिवसैनिक. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातील. त्यातही ठाकरे गटाचे. त्यामुळे सहानभूती मिळविण्यासाठी शिंदे आक्रमक झाले. मारहाण करणार्यांवर हत्येचा गुन्हा दाखल झाला आणि लगेच रिसॉर्ट जमीनदोस्त कऱण्याचे आदेश आले. खुद्द मुख्यंत्र्यांचे आदेश म्हटल्यावर महसूल आणि थेट संबंध नसलेली पालिका कारवाईला उतरली. सलग १६ तास कारवाई करून रिसॉर्ट जमीनदोस्त करण्यात आले. यानिमित्ताने चर्चा सुरू झाली ती रिसॉर्टवरील कारवाई योग्य की अयोग्य त्याची. रिसॉर्ट अनधिकृत होते हे सत्य पण कारवाई सुडबुध्दीने झाली असाही एक प्रवाह सुरू झाला आहे.
हेही वाचा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
वसईच्या किनारपट्टीवर असणारे रिसॉर्ट, त्यामुळे होणारे विविध प्रकारचे तोटे हा विषय नवा नाही. गेल्या ३ दशकांपासून ही रिसॉर्ट संस्कृती एक समस्या बनली आहे. वसई पश्चिमेच्या किनारपट्टीवर अर्नाळा, नवापूर, जेलाडी ,राजोडी आदी परिसरात अनेक रिसॉर्ट आहेत. एकट्या अर्नाळा ते कळंब परिसरात २०० हून अधिक छोटी रिसॉर्ट असून ३५ तरणतलाव असलेली मोठी रिसॉर्ट आहेत.सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून, खाजण जमीनीवर हे बेकायदेशीर रिसॉर्ट उभारण्यात आले होते. दुसरीकडे सीआऱझेड ची मर्यादा ५०० मीटर वरून ५० मीटरवर आली. त्यामुळे रिसॉर्टची संख्या देखील वाढली
त्यावर आंदोलने झाली, मोर्चे झाली..पर्यावरणवादी लढून लढून थकले. पण रिसॉर्ट संस्कृती कमी न होता वाढली. कधी कुठल्याही रिसॉर्टवर कारवाई झाली नाही. झाली तरी ती दिखाऊ. मागील वर्षी जानेवारी महिन्यात नवापूर वटार येथील सी व्हूयू कॅफे, ओशन बीन हाऊस, कॅफे सी ॲण्ड सॅण्ड, सी कोस्ट फार्म कॅफे या ४ रिसॉर्टवर दिखाऊ कारवाई कऱण्यात आली होती. कारण कारवाई नंतर ते पुन्हा सुरू झाले. सेव्हन सी रिसॉर्टवर कारवाई सुडबुध्दीने झाली असा एक मतप्रवाह वसईत आहे. कारण कारवाई एकाच दिवसात थंडावली. त्यामुळे मृत्यूची सहानभूती मिळविण्यासाठी कारवाई केल्याचे स्पष्ट होत आहे. या कारवाईला विरोध असणाऱ्या वर्गाचा रिसॉर्टमधील गैरप्रकाराना समर्थन नाही पण कारवाई करतना नोटीस पाठवणे गरजेचे होते असे मत आहे. एका रिसॉर्टवर कारवाई केली मग बाकी शेकडो अनधिकृत रिसॉर्टवर कारवाई का नाही असा सवाल केला जात आहे.. रिसॉर्ट मधील हा काही पहिला मृत्यू नाही. मागील दिड वर्षात ७ जणांचा रिसॉर्टमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू झाला होता. तेव्हा अशी तत्परतेने कारवाई का झाली नाही? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा : महामार्गावर हायड्रोजन गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक उलटला, वसई फाट्याजवळ पहाटे झाला अपघात
पर्यटकांच्या हुल्लडबाजीचा स्थानिकांना त्रास
एकीकडे रिसॉर्टवरील या कारवाईला विरोध होत असला तरी दुसरीकडे स्थानिकांना मात्र आनंद झाला आहे. वसईच्या किनारपट्टीवरील रिसॉर्टमध्ये येणार्या पर्यटकांकाच्या हुल्लडबाजीचा येथील ग्रामस्थांना त्रास होत असतो. शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी या रिसोर्समध्ये जवळपास एक लाखांहून अधिक पर्यटक येत असतात. या रिसाॅर्टवर जाण्यासाठी पर्यटकांना रिक्षा ,टमटम (सहा आसनी रिक्षा) किंवा खाजगी वाहनातून आब्राहम नाका,नंदाखाल, वटार, दोन तलाव आदी मुख्य रस्ता सोडून असलेल्या मधल्या गावांमधून जाणाऱ्या रस्त्यांचा जवळचा पर्याय वाहतुकीसाठी निवडत असतात. मौजमजेसाठी आलेल्या या पर्यटकांकडून सर्रासपणे मद्यपान करून दारुच्या रिकाम्या बाटल्या रस्त्यावर फेकून देण्यात येतात. अनेकदा गावातील महिला, तरुणींची छेडछाडीचे प्रकार व ग्रामस्थांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या असल्यामुळे गावातील शांतता आता भंग पडत चालली आहे. प्रवासी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून रिक्षाचालक आठ ते दहा प्रवासी तर टमटम व खाजगी वाहनात जास्तीत जास्त प्रवासी कोंबून नेले जातात. त्यामुळे या रिसॉर्ट संस्कृतीवर आळा घालावा यासाठी स्थानिक सतत आंदोलन करत असतात. मागील वर्षी याविरोधात स्थानिकांनी मोठे आंदोलनही केले होते.
हेही वाचा : वसई : प्राध्यापिकेला चिरडणारा तरुण मद्यधुंद असल्याचे स्पष्ट, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
पर्यटनाचा विकास व्हावा पण नियमांच्या चौकटीत
समुद्रकिनारे म्हटलं की पर्यंटक येणार. त्यांना विरंगुळा म्हणून रिसॉर्ट हवेत. पण ते नियमांच्या चौकटीत. रिसॉर्ट मध्ये सतत पर्यटकांचा मृत्यू होत असतो. त्यामुळे रिसॉर्टमधील पर्यटकांची सुरक्षितता हा देखील एक ज्वलंत प्रश्न आहे. निसर्गाचा ऱ्हास न होता, नियमांच्या चौकटी पाळल्या, पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले तर रिसॉर्टचे स्वागत आहे. मात्र रिसॉर्टच्या नावाखाली चाललेला स्वैराचार आणि हुल्लडबाजी ही वसईच्या संस्कृतीलाच धोकादायक आहे.