वसई भाईंदर या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई- भाईंदर दरम्यान रोरो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारपासून या सेवेला प्रारंभ केला जाणार होता. मात्र ऐनवेळी या रोरो सेवेचे उदघाटन रद्द करण्यात आले. त्यामुळे पहिल्याच दिवशी उत्साही प्रवाशांना हिरमोड झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई खाडीमध्ये स्थानिक जनतेच्या सोयीसाठी व कोकणांत पर्यटन विकास व्हावा म्हणून “वसई – भाईदर” येथे ही रोरो सेवा सुरू केली जाणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे हा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. जान्हवी या फेरीबोटीची क्षमता ४० वाहने व १०० प्रवाशी अशी असणार आहे. या बोटीला केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेतून परवानगी मिळालेली असून जेटीची सर्व कामे महाराष्ट्र सागरी मंडळाने केली आहेत. ही बोट सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्दीसेस प्रा. लि. यांच्या मार्फत चालविली जाणार आहे.

हेही वाचा >>> अर्नाळा जेट्टीचे काम अजूनही अपूर्णच; ग्रामस्थांचे हाल कायम

वसई किल्ला जेट्टी ते भाईंदर असे तीन ते चार चार किलोमीटरचे अंतर सागरी मार्गाने अवघ्या १५ ते २० मिनिटात पोहचण्यास मदत होणार आहे.

त्यामुळे नागरिकांना वळसा घालून कराव्या लागणाऱ्या प्रवासातून सुटका होऊन वेळेची ही बचत होणार आहे.  या रोरो सेवेचे उदघाटन  मंगळवार दि १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात येणार होते. मात्र ऐनवेळी हे उदघाटन रद्द करण्यात आले.

अधिकारी वर्ग यांची महत्वाची बैठक असल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.त्यामुळे रोरो सेवेला प्रारंभ होण्यासाठी आणखीन काही दिवस लागणार आहेत.

उत्साही प्रवाशांचा हिरमोड पालघर जिल्ह्यात सुरू होणारी वसई भाईंदर ही पहिली रोरो सेवा आहे. या रोरो सेवेमुळे  वसई ते भाईंदर असा प्रवास अगदी सुलभ होणार असल्याने यातून प्रवास करण्यासाठी प्रवासी उत्सुक होते. मंगळवारपासून ही सेवा सुरू होत असल्याने काही प्रवासी जेट्टीवर जाऊन ही सेवा सुरू झाली का हे पाहण्यासाठी गेले होते. परंतु अजूनही या सेवेचे उदघाटन न झाल्याने ही सेवा सुरू झाले नसल्याचे समजताच उत्साही प्रवाशांचा हिरमोड झाला.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai ro ro service vasai fort to bhayandar ro ro ferry service inauguration cancelled zws