वसई- रस्त्याच्या कडेला वर्दळीच्या ठिकाणी खाद्यपदार्थांची विक्री करणारे तसेच गाड्या ठेवून वाहतुकीस अडळथा निर्माण करणार्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पेल्हार, वालीव पोलिसांनी दोन दिवसांत केलेल्या कारवाईत ५० जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
हेही वाचा – वसई : अनधिकृत इमारतींवरील कारवाई थंडावली, राडारोडा आणि मातीच्या ढिगार्यामुळे अडथळा
हेही वाचा – मध्य रेल्वेच्या वसई दिवा रेल्वे मार्गावरील वाहतूक जवळपास तीन तासांनी सुरळीत
शहरातील नागरिक अरुंद रस्ते, त्यावरील फेरिवाल्यांचे अतिक्रमण यामुळे त्रस्त आहेत. रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थ विक्रेत स्टॉल लाऊन विक्री करत असतात. ते स्वंयपाकासाठी गॅसचा वापर करतात. मात्र वर्दळीच्या आणि रहदारीच्या ठिकाणी अशा प्रकारे विनापरवाना गॅसचा वापर करणे धोकादायक असते. याशिवाय औद्योगिक क्षेत्रात रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता असते. अशा विक्रेते आणि वाहनांच्या विरोधाता मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाने कारवाई सुरू केली आहे. दोन दिवस चाललेल्या या कारवाईत ५० जणांविरोधात कलम २८५ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. सातिवली नाका, रेंज ऑफिस, गोलानी नाका, गोखिवरे, भोयदा पाडा आदी ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे.