वसई- डोळ्यादेखत तरुण मुलाचा समुद्रात झालेल्या मृत्यूमुळे धक्का बसलेल्या वसई विरार महापालिकेतील पालिका अधिकार्याचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मुला पाठोपाठ पित्याचाही मृत्यू सार्यांना चटका लावून गेला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पनवेल येथे राहणारे विनायक फासे (४६) हे वसई विरार महापालिकेच्या कर विभागात उपमुख्य लेखापरिक्षक म्हणून कार्यरत होते. २०२३ मध्ये ते वसई विरार महापालिकेत रूजू झाले. त्यांचा मोठा मुलगा सिध्दार्थ याला मुंबईत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. त्यामुळे फासे कुटुंबिय आनंदात होते. मंगळवारपासून (१९ ऑगस्ट) त्याचे महाविद्यालय सुरू होणार होते. त्यामुळे सर्व कुटुबियांनी फिरायला जाण्याचा निर्णय घेतला. फासे यांचे मित्र बिरादार यांच्या कुटुंबियांसमवेत १५ ऑगस्ट रोजी सर्वजण रत्नागिरीत फिरायला गेले. १५ ते १८ ऑगस्टपर्यंत ते कोकणात फिरणार होते. सर्व काही आनंदात सुरू होते. मात्र शनिवार १७ ऑगस्टचा दिवस त्यांच्यासाठी दु:खाचा ठरला.
हेही वाचा – दोन वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत, श्रद्धा वालकर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना
शनिवारी दुपारी ते कुटुंबासमवेत आरे-वारे येथील समुद्र किनारी गेले होते. समुद्र किनाऱ्यावर फिरत असताना त्यांचा मुलगा सिद्धार्थ हा सुमद्रकिनार्यावर गेला होता. मात्र अचानक आलेल्या एका लाटेमुळे सिद्धार्थ पाण्यात ओढला गेला. त्यांच्यासोबत असलेल्या प्रविण बिरादार यांनी त्याला वाचविण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने सिद्धार्थ आत ओढला गेला. सिद्धार्थला वाचविताना प्रविंद्र बिरादार हे देखील पाण्यात बुडू लागले. जीवरक्षकांनी त्यांना वाचवले मात्र सिध्दार्थचा बुडून मृत्यू झाला. आपल्या डोळ्यादेखत अवघ्या काही क्षणात मुलाचा मृत्यू झाल्याने विनायक फासे अक्षरश: कोलमडले.
रविवारी सकाळी पनवेलला सिध्दार्थच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पण या धक्क्याने विनायक फासे सावरले नव्हते. रविवारी त्यांना मित्र आणि सहकार्यांनी भेटून धीर दिला. सांत्वन केले. परंतु या अतिदुखामुळे रात्री साडेबाराच्या सुमारास विनायक यांना हृृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचाही मृत्यू झाला. पुत्रविरहाने कोलमडलेल्या पित्याचा असा झालेला दुर्देवी मृत्यू सर्वांना चटका लावून गेला आहे. सांगली येथील मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विनायक फासे यांच्या पश्चात पत्नी आणि ८ वीत शिकणारी एक मुलगी आहे.