वसई / पालघर : मागील आठवडाभरापासून विविध तांत्रिक अडचणींमुळे वसई भाईंदर रोरो सेवा सुरू होण्यास विलंब झाला होता. आता यातून मार्ग काढत महाराष्ट्र सागरी मंडळाकडून मंगळवारपासून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. सध्या “प्रायोगिक तत्त्वावर” रो-रो प्रवासी सेवा दिली जाणार आहे. वसई भाईंदर या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई- भाईंदर दरम्यान रोरो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्या मार्फत चालविली जाणार असून जान्हवी या फेरीबोटीची क्षमता ३३ वाहने व १०० प्रवाशी अशी असणार आहे. या बोटीला केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेतून परवानगी मिळालेली असून जेटीची सर्व कामे महाराष्ट्र सागरी मंडळाने केली आहेत. ही सेवा १३ फेब्रुवारी पासून सुरू केली जाणार होती. त्यानंतर १६ फेब्रुवारी पासून करण्याचे निश्चित केले होते. मात्र ऐनवेळी निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे सलग दोन वेळा याचे उदघाटन रद्द करावे लागले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा