वसई: २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला भाजपाचा वसई विरार जिल्हाउपाध्यक्ष संजू श्रीवास्तव हा फरार झाला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पक्षाने त्याची उपाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली आहे. २०२१ च्या होळीच्या दिवशी संजू श्रीवास्ताव (३५) याने २२ वर्षीय तरुणीला कामाचे पैसे देण्याच्या बहाण्याने नालासोपारा येथील घरी बोलावले. तेथे तिला गुंगीकारक द्रव्य पाजून तिच्यावर श्रीवास्तव आणि नवीन सिंग या दोघांनी बलात्कार केला होता. त्यावेळी तिच्या काढलेल्या अश्लील चित्रफितीच्या आधारे नवीन सिंग याने सतत तिच्यावर बलात्कार केला होता. या काळात पीडित गर्भवती राहिील होती. मात्र तिच्या सहमती शिवाय तिचा गर्भपात आरोपीने घडवून आणला होता. यानंतरही पीडितेला आरोपीपासून एक मुलगी झाली आहे. मात्र सतत तिला आरोपींकडून धमकी आणि शिविगाळ केली जात असल्याने तिने आचोळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून आचोळे पोलिसांनी आरोपी संजू श्रीवास्तव, नवीन सिंग आणि हेमा सिंग यांच्या विगोधात सामूहिक बलात्काराच्या कलम ३७६(ग)३७६(२)(एन)३२८,३१३, ५०६, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार आहेत.

हेही वाचा :मेट्रो ३ : आरे – बीकेसी भुयारी मार्गिकेवर दररोज मेट्रोच्या ९६ फेऱ्या, दिवसाला साडेचार लाख प्रवासी संख्या अपेक्षित

पीडितेवर पहिल्यांदा २०२१ मध्ये बलात्कार झाला होता. संजू श्रीवास्तव याने बलात्कार केल्याची घटना २०२१ मधील आहे. परंतु पीडितेने आता तक्रार दिल्याने आम्ही गुन्हा दाखल केला आहे. सध्या आऱोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्ता पुर्णीमा चौगुले-श्रींगी यांनी दिली. भाजपाचे वसई विरार जिल्ह्यात एकूण ८ उपाध्यक्ष आहेत. संजू श्रीवास्तव हा नायगाव मधील चित्रिकरण स्टुडियोमध्ये युनियन चालवतो. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला पदमुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी दिली.