वसई : येत्या रविवारी वसई विरार महापालिकेची ११ वी राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा आहे. या मॅरेथॉनच्या विविध प्रकारच्या तयारीची कामे पूर्ण झाली असून यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. या स्पर्धेत १४ हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. दरवर्षी वसई विरार महापालिकेमार्फत राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येते. यात विविध ठिकाणचे हजारो स्पर्धक सहभागी होतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदाही पालिकेच्या क्रीडा विभाग व वसई कला क्रीडा विकास मंडळ यांच्यातर्फे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेती पारुळ चौधरी इव्हेंट अॅम्बेसेडर आहे. तर ठाण्याचा दिग्गज नेमबाज रुद्राक्ष पाटील ‘फेस ऑफ द इव्हेंट’ म्हणून उपस्थित राहणार आहेत. यात चौदा हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. यात राष्ट्रीय स्तरावरील १४ धावपटू पूर्ण मॅरेथॉन धावणार आहेत. ३० धावपटू हे अर्ध मॅरेथॉन धावणार आहेत.

हेही वाचा : शहरबात : प्रदूषण रोखण्याचे मोठे आव्हान

मॅरेथॉनच्या मार्गात अडथळे निर्माण होऊ नये यासाठी पालिकेतर्फे विशेष काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये मॅरेथॉन मार्गात ज्या ठिकाणी खड्डे आहेत त्याठिकाणी डांबरीकरण करून पांढऱ्या रंगाचे पट्टे, योग्य दिशा माहिती पडावी यासाठी झाडांना रंग , दिशा दर्शक फलक , संरक्षक जाळ्या व ज्या ठिकाणाहून स्पर्धक धावणार आहेत, त्याठिकाणीच्या मार्गावर काही काळासाठी वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. तर ज्या ठिकाणाहून मॅरेथॉन सुरू होणार आहे त्याठिकाणी माध्यम कक्ष, मान्यवरांसाठी व्यासपीठ, तर काम पाहण्यासाठी स्वयंसेवक, सुरक्षारक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे. पालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत यावर लक्ष ठेवण्यात येत आहे, असे महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले. या स्पर्धेत ५४ लाखांची पारितोषिके दिली जाणार आहेत. याशिवाय राजकीय पक्षाचे पदाधिकारी व सिनेकलाकारही या मॅरेथॉनला हजेरी लावणार आहेत.

हेही वाचा : विरारच्या म्हाडा वसाहतीत आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट केंद्र, दोन वर्षात ३०० मुलींचा देहव्यावापार

१) पालिकेची आरोग्य सेवा

मॅरेथॉन दरम्यान एखादी दुर्घटना घडली तर त्याचे निवारण करण्यासाठी पालिकेचे वैद्य, परिचारिका, आरोग्य सेवक असे ८४७ कर्मचारी व इतर डॉक्टर असोसिएशनचे सदस्य यांची मदत घेऊन १९ ठिकाणी आरोग्य केंद्र उभारून त्यात पथके नेमली आहेत. याशिवाय मॅरेथॉन मार्गावरसुद्धा रुग्णवाहिका व फिरते आरोग्य पथक नेमले जाणार आहे.

२) शासकीय आणि पोलीस अधिकारीही धावणार

वसई विरार महापालिकेच्या ११ व्या राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत इतर स्पर्धकांसोबतच शासकीय व पोलीस अधिकारी धावणार आहेत. आयपीएस विश्वास नांगरे पाटील, कृष्ण प्रकाश, पालघर जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांसह पालिकेचे अधिकारी व इतर पोलीस कर्मचारी यात धावणार आहे.

हेही वाचा : प्रेयसीने घरी बोलावले, आईने केला चाकूने हल्ला; जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू

३) मॅरेथॉन मार्गाला सौंदर्याचा साज

वसई विरार महानगरपालिकेच्या मॅरेथॉन मार्गावर विविध ठिकाणी सामाजिक संदेश देणारी आकर्षक चित्र रेखाटण्यात आली आहेत. याशिवाय दुभाजकांना रंगरंगोटी, रस्त्यांच्या कडेला वृक्षारोपण करण्यात आले
आहे, त्यामुळे मॅरेथॉन मार्ग निसर्ग सौंदर्याने फुलून गेला आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai virar city municipal corporation did all preparation for 11 th national marathon css