वसई: वसई-विरार महापालिका निवडणुकीच्या तोंडावर करवाढ न करणारा अर्थसंकल्प सादर करून प्रशासनाने नागरिकांना दिलासा दिला आहे. मात्र, त्याचवेळी उत्पन्नवाढीसाठी नवीन मार्ग शोधण्याचे आव्हानही प्रशासनासमोर आहे. त्याचाच एक भाग म्हणून ज्या मालमत्तांवर आजतागायत करआकारणी झाली नाही, अशा मालमत्तांचा शोध घेऊन त्यांच्यावर कर आकारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

वसई-विरार महापालिकेला मागील वर्षी मालमत्ता करातून ३०६ कोटी ८ लाख इतके उत्पन्न मिळाले होते. आगदी आर्थिक वर्षांत पालिकेने ३३६ कोटी ५४ लाख मालमत्ता करवसुलीचे लक्ष्य ठेवले आहे. त्याअंतर्गत शहरातील नव्या मालमत्तांचा शोध घेऊन त्यांना कर आकारण्यात येणार आहे. त्यासोबत पालिकेकडे नोंद करण्यात आलेल्या ७१७ मोबाइल मनोऱ्यांच्या चालकांकडूनही कर वसूल केला जाणार आहे.  वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात नव्याने उभ्या राहणाच्या इमारतींना ना हरकत देताना आकारले जाणारे विशेष अग्निसंरक्षण शुल्क  आणि विशेष अग्निशमन उपकर यातून सन २०२२-२३ मध्ये ६ कोटीने  वाढ करत यावर्षी  ३० कोटी ०५ लाख इतका निधी अपेक्षित असल्याचे अर्थसंकल्पात म्हटले आहे. याखेरीज पालिकेच्या जाहिरातधोरणानुसार मिळणाऱ्या निधीत यंदा आणखी वाढ होऊन तो सहा कोटी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षीपासून पालिकेने शहरात स्वच्छता कर आकारणी सुरू केली असून त्यातून आगामी आर्थिक वर्षांत ३३ कोटींचे उत्पन्न गृहीत धरले आहे. 

Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Amrit Jyeshtha Nagarik yojna and Mahila Samman Yojana led to increased ST Pune Division Revenue
एसटी भरधाव ! महिला सन्मान याेजनेतून किती केली कमाई ?
pimpri chinchwad property tax marathi news
पिंपरी-चिंचवडमध्ये अडीच लाख मालमत्ताधारकांनी बुडविला कर
loksatta readers feedback
लोकमानस: …त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी!
High Court expresses concern over increasing interest burden on government exchequer due to delay in tax refunds
कर परताव्यातील विलंबामुळे सरकारी तिजोरीवर व्याजाचा वाढता बोजा, उच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त
bitcoin price review bitcoin prices got a boost reaches 100000 usd
विश्लेषण : ‘बिटकॉइन’ पोहोचले १ लाख डॉलरवर… का आणि कसे? भारतात मान्यता मिळेल?
akola action against pending vehicle fine special campaign for penalty recovery implemented
अकोला : सावधान! ४.८१ लाख वाहनांवर तब्बल २३.७८ कोटी थकीत, फौजदारी कारवाई…

महसुली अनुदानातून ४५४ कोटी

महसुली अनुदानातून पालिकेला सन २०२२- २३ मध्ये ३८४ कोटो ७८ लाख रुपयाचे उत्पन्न अपेक्षित आहे. यासह मुद्रांक शुल्क अनुदान, रस्ते दुरुस्तीसाठी,  वाचनालय अनुदान, अशा विविध अनुदानातून पालिकेला यावर्षी ४५४ कोटी ६६ लाख रुपयाचा निधी अपेक्षित आहे.

अन्य ठळक तरतुदी

पथदिवे व विद्युत व्यवस्थेसाठी ९६ कोटी

शहरातील मुख्य रस्त्यावर आवश्यकतेनुसार पथदिवे लावण्यात येणार आहेत. अपारंपरिक ऊर्जास्रोत निर्मिती, एल. ई. डी. दिव्यांची व्यवस्था, विद्युतदेयक, विद्युत मंडळाचे चार्जेस, पोल स्थलांतर, नवीन पोल उभारणे, भूमिगत वाहिन्या, टायमर व्यवस्था, यासाठी पालिकेने ९६.१२ कोटींची तरतूद प्रास्तावित करण्यात आली आहे.

परिवहन सेवेसाठी ५४ कोटी

परिवहन सेवेत ई बसेसचा समावेश करण्यात येणार आहे. याशिवाय परिवहन उपक्रमासाठी यशवंत नगर येथे परिवहन भवनाचे बांधकाम चालू आहे. त्या अनुषंगाने बस खरेदी व परिवहन भवन बांधकाम यासाठी मुख्य निधी कडून परिवहन उपक्रमासाठी ५४ कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.

अग्नीसुरक्षेसाठी ९२ कोटी

अग्निशमन विभागाच्या निधीत  ६० कोटींहून अधिक रकमेची वाढ करण्यात आली आहे. यात आधुनिक यंत्रणा उपलब्ध केली जाणार आहे. यासाठी ९२ कोटी ४४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पूरस्थिती नियंत्रणासाठी ९ कोटी ५० लाख

वसई विरार शहरात मागील काही काळात पूरस्थितीची समस्या निर्माण होत आहे. याचा मोठा फटका शहरातील नागरिकांना बसत आहे. या समस्या सुटाव्यात यासाठी यांत्रिक नालेसफाई व इतर पूरप्रतिबंधक कामांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ९ कोटी ५० लाख रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे.

घनकचरा व्यवस्थापनासाठी २५२ कोटी

क्षेपणभूमीवर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्याकरिता घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत एम आर ई, सीएनडी वेस्ट, हिरवा कचरा, तसेच बायोगॅस प्रकल्प राबविण्यात येणार आहे. दैनंदिन साफसफाई, डास निर्मूलनसह सार्वजनिक स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन यासाठी २५२ कोटी ६३ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

सूर्या योजनेतून ४०३ दशलक्ष लिटर

पाणीपुरवठा योजनेतून १८५ दशलक्ष लिटर पाणी डिसेंबर २०२२ अखेर उपलब्ध होणार असून सदर पाणी वितरित करण्याच्या दृष्टीने वितरण व्यवस्था विस्तारीकरण व बळकटीकरण करिता पालिकेने स्वतंत्र ५० कोटीची तरतूद केली आहे. याशिवाय पाणीपुरवठा व देखभाल दुरुस्ती यासाठी २६३ कोटी १७ लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे.

महिला बालकल्याण योजनांसाठी १७ कोटी ८६ लाख

महिला बालकल्याण विभागाकडून वसई विरार शहरात विविध योजना राबविल्या जात आहेत. यावर्षीच्या अर्थसंकल्पात पालिकेने भरीव अशी तरतूद केली आहे. २०२१-२२ मध्ये ९ कोटी ६१ लाख इतकी तरतूद केली होती. यात पालिकेने वाढ करून यावर्षी १७ कोटी ८६ लाख रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे.

Story img Loader