वसई : निवडणूक काळात वसई विरार शहरात पैशांचा पाऊस सुरूच आहे. शुक्रवारी सलग दुसर्‍या दिवशी विरार २ कोंटी रुपयांची रोकड पालिकेच्या भरारी पथकाने जप्त केली आहे. गुरूवारी देखील नालासोपारा, मांडवी आणि मिरा रोड मध्ये ७ कोटी ८० लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती. बॅंकेच्या एटीएम व्हॅन मधून या बेहिशोबी पैसे नेण्यात येत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका बॅंकेच्या एटीएम व्हॅन मधून बेहिशोबी पैसे नेले जात असल्याची माहिती वसई विरार महापालिकेच्या भरारी पथकाला माहिती मिळाली होती. शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास विरार पश्चिमेच्या भाजी मार्केट परिसरात सापळा लावून बॅंकेच्या एटीएम व्हॅन ताब्यात घेतली. या व्हॅन मध्ये २ कोटींहून अधिक रुपयांची रोकड आढळली आहे. सध्या मोजणी सुरू आहे अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी दिली. या रकमेचा कुठलाही अधिकृत कागदपत्रे संबंधितांकडे नव्हती. ही रोकड जप्त करण्यात आली असून आयकर विभागाला पुढील कारवाईसाठी प्रकरण सोपविण्यात आले आहे. भरारी पथकाचे प्रमुख बेंजामिन डाबरे, नरेंद्र संख्ये, पोलीस कर्मचारी अनिल सोनावणे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

हे ही वाचा… एटीएम केंद्रातील अलार्मचा ५ तास नागरिकांना मनस्ताप

गुरूवारी देखील नालासोपाऱ्याच साडेतीन कोटी, विरारच्यामांडवी येथे २ कोटी ८० लाख रुपये आढळले आणि मिरा रोड मध्ये १ कोटी ४७ लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. विशेष म्हणजे हे सर्व बेहिशोबी रक्कम बॅंकांच्या एटीएम व्हॅन मधूनच जप्त करण्यात आल्या आहेत.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai virar municipal corporation flying squad seizes more than 2 crore rupees asj