तोतया डॉक्टर वाडकर प्रकरणानंतर वसई-विरार महापालिकेला जाग

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विरार : फरार तोतया डॉ. सुनील वाडकर आणि त्याची पत्नी आरती वाडकर यांच्या अनधिकृत रुग्णालयात बेकायेदशीर गर्भिलग चिकित्सा केली जात असल्याचे तसेच बेकायदा गर्भपात केला जात असल्याचे उघडकीस आल्यानंतर पालिका खडबडून जागी झाली आहे. पालिकेने शहरातील सर्व वैद्यकीय गर्भपात केंद्रे आणि सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करण्यासाठी पथकांची स्थापना केली आहे. 

शहरातील बोगस डॉक्टर आणि त्यांचे कारनामे ‘लोकसत्ता’ने उघडकीस आणले होते. तोतया डॉक्टर सुनील वाडकर याची पत्नी दंतचिकित्सक असून तो त्यांच्या अनधिकृत असलेल्या हायवे रुग्णालयात गर्भपात केंद्र चालवत असल्याचे वृत्त लोकसत्ताने प्रसिद्ध केले होते. दंतचिकित्सक असून गर्भपात केंद्र चालविण्यामागचे कारण काय, असा सवाल उपस्थित झाला होता.

या केंद्रात गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व गर्भिलग चिकित्सा केली जात असल्याचा आरमेप होता. त्यामुळे पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी शहरातील सर्व वैद्यकीय गर्भपात केंद्रे आणि सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करण्यासाठी आठ पथकांची स्थापना केली आहे.

पालिकेच्या चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची त्यासाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करम्ण्यात आली आहे.

केंद्रचालक सावध

शहरात मोठय़ा प्रमाणात प्रसूती रुग्णालये आणि सोनोग्राफी केंद्रे आणि एमटीपी केंद्रे सुरू आहेत. पालिकेकडून केवळ प्राथमिक चाचणी करून त्यांना परवानगी दिली जाते. यानंतर या केंद्रांची कोणतीही तपासणी पालिकेकडून केली जात नाही. यामुळे अनेक केंद्रांत गर्भिलग निदान केले तरी याची माहिती मिळत नाही. त्यात कोणतीही परवानगी न घेता काही केंद्र बिनदिक्कत आपला व्यवसाय करत आहेत. ही कारवाई २० जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत राबवावी असे आयुक्तांनी सांगितले आहे. ही कारवाई गोपनीय असली तरी त्यांचा कार्यक्रम सार्वजनिक झाल्याने सोनोग्राफी केंद्रे आणि वैद्यकीय गर्भपात केंद्रचालक सावध झाले आहेत.