वसई:  अनधिकृतपणे शहरात उभारल्या जाणाऱ्या जाहिरात बाजीला लगाम घालण्यासाठी पालिकेने जाहिरात फलक व्यवस्थापन संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. याद्वारे आता प्रत्येक जाहिरात फलकावर क्विक रिस्पॉन्ड कोड (क्यूआर) लावला जाणार आहे. वसई- विरार महापालिकेने स्वत: जाहिरात फलक व्यवस्थापन केले जात आहे. जाहिरात फलक लावण्याची परवानगी देऊन त्यातून जाहिरात कर पालिकेला मिळू लागला आहे.

असे जरी असले तरी शहरात अनेक ठिकाणी बेकायदा व नियमबाह्य जाहिरात फलक लावले जातात यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असते. तर दुसरीकडे पालिकेचे कर स्वरूपात मिळणारे उत्त्पन्न बुडते. तसेच काही वेळा जाहिरात फलक उभारताना पालिका परवानगी दिली जाते. त्यावर पालिकेचा आवक जावक क्रमांक असणे क्रमप्राप्त असताना काही वेळा तो नसतो त्यामुळे जाहिरात दाराने याची परवानगी घेतली किंवा नाही याची माहिती मिळत नाही. तर काहीजण याचाच गैरफायदा घेत धोकादायक पध्दतीने सुद्धा जाहिरात फलक उभे करतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. असे प्रकार टाळण्यासाठी जाहिरात धोरण निश्चित करण्याची गरज असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने ही स्पष्ट केले होते. याच पार्श्वभूमीवर आता जाहिरात फलकांची परवानगी घेतली आहे किंवा कधी पर्यँत त्याची परवानगी आहे याची माहिती जनतेला कळावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, शहरात लागणाऱ्या जाहिरात फलकावर क्विक रिस्पॉन्ड कोड व जाहिरात फलक व्यवस्थापन संगणक प्रणाली विकसित करण्याचा निर्णय वसई-विरार महापालिकेने घेतलेला आहे. याकरता मे. ऑरनेट टेक्नोलॉजिस प्रा. लि. या एजन्सीची नियुक्त केली आहे. प्रणाली विकसित करणे व तिच्या देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे साडे नऊ लाख रुपये इतका निधी खर्च केला जाणार आहे अशी माहिती पालिकेने दिली आहे. या जाहिरात व्यवस्थापनामुळे बेकायदेशीर पणे उभ्या केलेल्या जाहिरात बाजीवर नियंत्रण मिळविण्यास मोठी मदत होणार आहे.

Will not be forgiven if entrepreneurs are troubled says Devendra Fadnavis
उद्योजकांना त्रास झाल्यास क्षमा केली जाणार नाही… मुख्यमंत्र्यांनी कुठल्या नेत्यांना दिला इशारा!
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
pune police news in marathi
पुणे : खर्च महापालिकेचा, नियंत्रण पोलिसांना का हवे? नक्की काय आहे प्रकार
pune crime news in marathi
Pune Crime News : बिबवेवाडीत टोळक्याकडून ५० हून अधिक वाहनांची तोडफोड
pimpri chinchwad municipal corporation
पिंपरी : नळजोड तोडणीबाबतचे ‘एसएमएस’ फसवणुकीचे; महापालिकेने केले ‘हे’ आवाहन
foreign liquor worth Rs 6 lakh seized from tempo on wada shahapur road
वाडा-शहापूर मार्गावर टेम्पोच्या चोरकप्प्यातून सहा लाखाचा विदेशी मद्य साठा जप्त
Commissioner orders surgical strike on encroachments to break traffic jam
कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश
Thackeray groups protest against ST ticket price hike in thane
ठाकरे गटाचे एसटी तिकीट दरवाढी विरोधात आंदोलन

हेही वाचा… नालासोपार्‍यात बनावट जन्म दाखला तयार केल्याचे उघडकीस, तरुणीसह दोघांवर गुन्हे दाखल

ऑनलाइन सुविधा अशी…

जाहिरात फलक व्यवस्थापन संगणकीय प्रणाली विकसित झाल्याने आता जाहिरात फलकावर क्यूआरकोड लावला जाणार आहे. याशिवाय जाहिरात कर जमा करण्यासाठी ऑनलाईन पेमेंट गेटवे सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जाहिरात विभागाच्या दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन, परवानगी अर्ज करण्याची सुविधा, परवानगी देताना क्यूआर कोड जनरेट करणे, जाहिरात शुल्क व इतर भरणा अशी सर्व सुविधा यामुळे उपलब्ध होणार आहे. लवकर ही प्रणाली अंमलात आणली जाईल असे माहिती पालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागातून देण्यात आली आहे.

हेही वाचा… विरारच्या लॅबमधील अहवालावर नवी मुंबईच्या डॉक्टरची सही, पालिकेकडून चौकशी सुरू

धोकादायक फलकबाजी सुरूच

वसई विरार शहरात विविध संस्थेच्या जाहिराती, राजकीय पक्षाचे फलक, वाढदिवस फलक हे कोणत्याही प्रकारची परवानगी घेताच लावले जातात. अनेकदा हे फलक कार्यक्रम संपला तरी सुद्धा वर्षानुवर्षे तसेच असतात. तर काही वेळा रस्त्यालगत व दुभाजकांच्या खांबाला लटकत असतात यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. या धोकादायक जाहिरात फलकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Story img Loader