वसई- विरार मधील एका खासगी लॅब मध्ये नवी मुंबईच्या डॉक्टरच्या सहीने रुग्णांना वैद्यकीय तपासणी अहवाल दिला जात असल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. पालिकेने या लॅबसह शहरातील सर्व पॅथोलॉजी लॅबची तपासणी सुरू कऱण्यास सुरवात केली आहे. वसई विरार शहरातील ६ खासगी पॅथॉलॉजी लॅब मध्ये गुजराथच्या डॉक्टरांच्या सह्यांचा वापर करून वैद्यकीय तपासणी अहवाल दिला जात असल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. मात्र लॅब चालक आणि संबंधित डॉक्टर राजेश सोनी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. हा प्रश्न हिवाळी उपस्थित करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले होते.

दरम्यान असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. विरार मधील एका खासगी लॅब मध्ये नवी मुंबईच्या डॉक्टरच्या सहीने अहवाल दिला जात आहे. विशेष म्हणजे या डॉक्टरचा परवाना देखील काही वर्षांपूर्वी रद्द करण्यात आला होता. नवी मुंबईचा डॉक्टर विरार मध्ये रक्त नमुने तपासणीसाठी दररोज कसा येऊ शकेल असा सवाल उपस्थित झाला आहे. त्यामुळे हा प्रकार देखील बोगस असून सर्वसामान्य रुग्णांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा असल्याच्या तक्रारी रुग्णमित्रांनी केल्या आहे. या प्रकरणी आम्ही संबंधित लॅबच्या चौकशीचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत. त्यांच्या तपासणींतरच पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त (आरोग्य) विनोद डवले यांनी दिली आहे. शहरातील सर्व लॅबची तपासणी देखील केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
research to prevent memory issues in children with brain tumors
मेंदूत गाठ असलेल्या लहान मुलांमधील स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी संशोधन; गेल्या दोन वर्षांत टाटा रुग्णालयाचे संशोधन पूर्ण
BCCI conducts 6 hour review meeting with Indian team management
BCCI : टीम इंडियाच्या पराभवावर सहा तास चालली बीसीसीआयची बैठक, रोहित-गंभीरला विचारले ‘हे’ तीन महत्त्वाचे प्रश्न
elderly woman rescued by fire brigade after being trapped in flat
सदनिकेत अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची सुटका- बेशुद्धावस्थेतील महिलेवर त्वरीत उपचार केल्याने अनर्थ टळला
Accused who surrendered in Kalyaninagar accident case remanded in police custody Pune
कल्याणीनगर अपघात प्रकरणात शरण आलेल्या आरोपीला पोलीस कोठडी

हेही वाचा… वसई : स्वाभिमानी वसईकर संस्थेचे व्हिक्टर मच्याडो यांचे निधन

हेही वाचा… वसई : रुग्णांना रक्त देण्याची जबाबदारी रुग्णालयांचीच, पालिकेकडून सर्व खासगी रुग्णालयांना नोटीसा

एकाच डॉक्टराची स्वाक्षरी अनेक लॅब मध्ये केली जात असल्याचे प्रकार सर्वच शहरात सुरू आहे. अशा लॅबची चौकशी करून गुन्हे दाखल करावे असे निवेदन महाराष्ट्र परावैद्यक परिषदेने पोलीस महासंचलाकंना ऑगस्ट महिन्यात दिले होते. महाराष्ट्र परावैद्यक परिषदेकडे ५ हजार ४३३ प्रयोगशाळा तंत्रज्ञ नोंदणीकृत आहेत. मात्र नोंदणीकृत तंत्रज्ञाचे नाव अनोंदणीकृत लॅबोरटरी चालकांकडून वापरण्यात येत असल्याबाबत शासनाकडे अथवा पराराष्ट्र परावैद्यक परिषदेकडे लेखी तक्रार आली नसल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीम यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे.