वसई- विरार मधील एका खासगी लॅब मध्ये नवी मुंबईच्या डॉक्टरच्या सहीने रुग्णांना वैद्यकीय तपासणी अहवाल दिला जात असल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. पालिकेने या लॅबसह शहरातील सर्व पॅथोलॉजी लॅबची तपासणी सुरू कऱण्यास सुरवात केली आहे. वसई विरार शहरातील ६ खासगी पॅथॉलॉजी लॅब मध्ये गुजराथच्या डॉक्टरांच्या सह्यांचा वापर करून वैद्यकीय तपासणी अहवाल दिला जात असल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. मात्र लॅब चालक आणि संबंधित डॉक्टर राजेश सोनी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. हा प्रश्न हिवाळी उपस्थित करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in