वसई : विविध शासकीय मोहीमा, सर्वेक्षण आणि आता लागू झालेली आचारसंहिता यामुळे यावर्षी मालमत्ता कर वसुलीवर त्याचा परिणाम झाला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षाअखेर पालिकेने ३३८ कोटींची मालमत्ता कर वसुली केली आहे. चारशे कोटींचे ठेवलेले उद्दिष्ट मात्र अपूर्ण राहिले आहे. वसई विरार भागात ९ लाखांहून अधिक छोट्या मोठ्या औद्योगिक वसाहती, उपहारगृहे, इमारती, सदनिका अशा विविध मालमत्ता आहेत. या मालमत्ताकरातून पालिकेला उत्त्पन्न मिळते. मागील वर्षी वसई विरार महापालिकेने विक्रमी ३७१ कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची वसुली केली होती. त्यामुळे यंदा पालिकेने ४०० कोटी रुपये मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

त्यानुसार पालिकेच्या कर संकलन विभागाने महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या आदेशानुसार सुरवातीपासून मालमत्ता कर वसुलीवर भर दिला होता. सर्वाधिक कर वसूल व्हावा यासाठी विविध मोहिमा, अभय योजना, मालमत्ता जप्तीची कारवाई अशा उपाययोजना आखल्या होत्या. त्यानुसार कर वसूल करण्याचे काम जोमाने सुरू होते. डिसेंबरच्या अखेरीस पालिकेने २४४ कोटींचा टप्पा पार केला होता. त्यामुळे जानेवारी ते मार्च अशा तीन महिन्यांत पालिकेने ठरविलेले चारशेकोटींचे उद्दिष्ट सहज पूर्ण होईल. मात्र पालिकेने अपेक्षित केलेले उद्दिष्ट मार्च अखेरपर्यंत पालिकेला गाठता आले नाही. यंदाच्या आर्थिक वर्षाअखेर पालिकेच्या तिजोरीत ३३८.१५  कोटींचा मालमत्ता कर वसूल झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मालमत्ता कराची वसुली ३३ कोटींनी कमी झाली आहे.

हेही वाचा : भाईंदर मधील १४९ शस्त्रे पोलिसांकडे जमा; ५ जण तडीपार

शासकीय कामांचा मालमत्ता कर वसुलीवर परिणाम

मालमत्ता कर वसुलीसाठी पालिकेने नियोजन आखले होते. मात्र ऐनवेळी शासनस्तरावरून विविध शासकीय मोहीमा, मराठा आरक्षण सर्वेक्षण आणि आता लागू झालेली आचारसंहिता यामुळे यावर्षी मालमत्ता कर वसुलीवर त्याचा परिणाम झाला आहे. करवसुलीसाठी जे कर्मचारी होते त्यांना या कामासाठी नियुक्त करावे लागले असल्याचे पालिकेने सांगितले आहे.

कर थकीत ठेवणाऱ्या ९ हजार मालमत्तांना टाळे

मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्त्पन्नाचा स्त्रोत आहे. मागील काही वर्षांपासून मालमत्ता धारकांनी कर भरणा करावा यासाठी नोटिसा दिल्या होत्या. तरीही थकबाकीदार कर भरणा करण्यासाठी पुढे येत नसल्याने त्यांच्या मालमत्तांना टाळे ठोकण्यास पालिकेने सुरवात केली होती. यंदाच्या वर्षी पालिकेने ९ हजार ९७ मालमत्तांना टाळे ठोकले आहे. तर २७५ जणांचा पाणी पुरवठा खंडित केला असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

हेही वाचा : वसई: पत्नीच्या हत्येचा आरोपी पॅरोलवरून फरार, वालीव पोलिसांनी ५ वर्षानंतर केली अटक

कर आकडेवारी 

वर्ष कर वसुली 
२०२१-२२३२१ कोटी
२०२२-२३३७१ कोटी 
२०२३-२४३३८ कोटी