वसई- मिठागराच्या पंधराशे एकर जागेवर ‘ना विकास क्षेत्र’ असल्याचे कारण देत पालिकेन धारण तलाव (होल्‍डिंग पॉण्ड) तयार करण्यास नकार दिला होता. मात्र आता याच जागेवर विशेष विकास क्षेत्र (एसडीझेड) प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे पालिका धारण तलावासाठी उदासिन असल्याचे दिसून येत आहे.

वसईकर मागील काही वर्षाेपासून पूरसंकटाचा सामना करत आहे. पावसाळ्यात संपूर्ण जनजीवन विस्कळीत होत आहे. पुरामुळे वीजपुरवठा खंडित होऊन येथील पाणीपुरवठा ठप्प होणे,  रेल्वे रेल्वेरूळावर पाणी साचून रेल्वे तसेच रस्ते  वाहतूक ठप्प होणे असे प्रकार घडतात. शहरातील अनेक भागात पाणी जाऊन कोट्यावधी रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. ही पूरपरिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी) आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) या सत्यशोधन समित्यांनी शहरात धारण तलाव (होल्डिंग पॉन्ड) विकसित करणे आवश्यक असल्याचे सांगितले होते. धारण तलावामुळे शहरातील पाण्याचा निचरा सुयोग्य पद्धतीने होऊन पूरसमस्या सुटली असली. मात्र अद्यापही पालिकेला धारण तलाव तयार करता आलेले नाही.  नालासोपारा पश्चिमेपासून वसईच्या सनसिटी पर्यंत असलेली १५०० एकर जागा ही राज्य शासनाच्या मालकीची आहे. ही जागा ‘गोगटे सॉल्ट’ या कंपनीला  मिठागर चालविण्यास दिली होती. या कंपनीचा करार हा संपलेला आहे. त्यामुळे ही जागा मोकळी आहे. या जागेवर धारण तलाव तयार करावा अशी मागणी माजी नगरसेविका जोस्पीन फरगोस यांनी केली होती. परंतु महापालिकेने ही जागा ‘ना विकास क्षेत्रात’ येत असल्याचे सांगून या ठिकाणी धारण तलाव शक्य नाही असे लेखी उत्तर दिले होते.

मग विशेष विकास क्षेत्र कसे प्रस्तावित केले?

जर या ठिकाणी ना विकास क्षेत्र आहे तर मग पालिकेने नुकतेच विशेष विकास क्षेत्र (एसडीझेड) कसे काय प्रस्तावित केले आहे, असा सवाल फरगोस यांनी केला आहे. यावरून पालिका धारण तलाव बनविण्यासाठी उदासिन असल्याचे दिसून येत आहे. ही जागा प्रचंड मोठी आहे. त्यामुळे विकास क्षेत्र तयार करताना या ठिकाणी धारण तलाव देखील बनवावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

धारण तलावाची आवश्यकता

या मिठागराच्या जागेतून वसई तालुक्यातील गास, सोपारा, निर्मळ, वाघोली, नाळे, सालोती, सांडोर, चूळणे, दिवाणमान, भुईगाव, गिरीज, बोळींज, उमराळे, करमाळे, समेळपाडा, नालासोपारा शहर, नवघर-माणिकपुर, इतक्या गावांतील पावसाळ्याचा पाणी जाती, गेल्या तीन वर्षापासून वसई-विरार शहर व इतर आजूबाजूचा ग्रामीण भाग हा पावसाळ्यात पुराखाली जात आहे. शहरातील नाले आणि नजीकच्या परिसरात नैसर्गिक नात्यांवरील वरील अतिक्रमणे, बेकायदा माती भराय भराय आणि बेकायदा बांधकामे करण्यात आली आहे. या मिठागराच्या जागेवर धारण तलाव झाल्यास पश्चिम पट्ट्यातील गावातील पूरसमस्या सुटू शकणार आहे.

Story img Loader