कल्पेश भोईर

करोना महासाथ सुरू झाल्यानंतर आरोग्यव्यवस्था बळकट असणे किती गरजेचे आहे ते समोर आले होते. मात्र वसई-विरार शहरातील प्रशासन आरोग्याच्या बाबतीत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. शहरातील उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न प्रलंबित आहे तर दुसरीकडे ग्रामीण भागातील रुग्णालय मंजूर होऊन ५ वर्षे उलटली तरी कामाला सुरुवात होत नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिक भरडला जात असून खासगी रुग्णालये त्यांची लूट करत असतात.

The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Maharashtra hospitals loksatta news
दोन कोटींनी वाढली बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची संख्या
CM Devendra Fadnavis and Pankaj Bhoyar will visit Datta Meghes residence in Khamla
असा गुरु, असा शिष्य! मंत्रिपद मिळाल्यानंतर प्रथम भेट सावंगीत…
CAG report reveals errors in Maharashtras health services from 2016 to 2022
राज्यातील आराेग्य व्यवस्थेवर कॅगचे ताशेरे
Pune Municipal Corporation takes action after stray dog ​​attack
भटक्या श्वानांच्या हल्ल्यानंतर महापालिकेने उचलले हे पाऊल!
Pune Pigeon grain, Pune Pigeon,
पुणे : पारव्यांना धान्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, वसूल केला इतक्या हजारांचा दंड !
Proposal to set up independent cancer hospital in Pune gains momentum
शहरबात : पुणेकरांच्या भविष्यासाठी आता तुमची साथ हवी!

मागील काही वर्षांत वसई-विरार शहरात एकही शासकीय सुसज्ज रुग्णालय उभे राहू शकले नाही. तर दुसरीकडे वसई तालुक्यात जी काही मंजूर झालेली रुग्णालये आहेत तीसुद्धा अद्याप पूर्णत्वास गेली नाहीत. त्यामुळे येथील वसईकर जनतेला आजही खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत लागत असतो. यामध्ये अनेकदा सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक लूटही होत असते. अशी परिस्थिती असतानाही  एकही सुसज्ज रुग्णालय उभे न राहणे ही एकप्रकारे वसईकरांची शोकांतिका आहे.

वसई-विरार परिसर हा सागरी, नागरी आणि डोंगरी अशा  भागांत विस्तारलेला आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण असे दोन्ही भाग यात मोडतात. मागील काही वर्षांत वसईचा परिसर हा झपाटय़ाने विकसित होऊ लागला आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्या ही २५ लाखांच्या घरात जाऊन पोहचली आहे. एखादे शहर जसजसे विकसित होत जाते त्यासोबत त्या ठिकाणी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधाही नागरिकांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तसेच आरोग्यसेवाही तेवढीच बळकट होणे गरजेचे आहे. परंतु त्याउलट चित्र हे वसई-विरारमध्ये दिसून येते.

वसई-विरारमध्ये एक तरी शासकीय सुसज्ज ( सुपर मल्टीस्पेशालिटी ) असे रुग्णालय व्हावे अशी मागणी वसईकर गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. परंतु त्याकडे सातत्याने शासनाने दुर्लक्ष केले असल्याने अडचणी या दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. त्यामुळे आजही वसईच्या नागरिकांना आरोग्याच्या निगडित एखादी मोठी समस्या निर्माण झाल्यास मुंबईसारख्या ठिकाणी धाव घ्यावी लागते. तर काही वेळा खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो.  यात वेळ, पैसा तर वाया जातोच. शिवाय नातेवाईकांची मोठी ओढाताण होत असते. तर काही वेळा खासगी रुग्णालयात होणारा खर्च हा सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारा नसतो. अनेकदा खासगी रुग्णालये अवाच्या सवा देयके आकारारून सर्वसामान्य जनतेची लूट करीत असतात. याचा प्रत्यय हा करोना काळातही प्रकर्षांने दिसून आला आहे. अशा प्रकारे होणाऱ्या अतिखर्चीक बाबींमुळे काही वेळा नागरिक स्वत:ला झालेले दुखणे लपविण्याचा प्रयत्न करतात. तर काही नागरिक रुग्णालयापासून दूरच राहतात. मग अशा नागरिकांच्या उपचाराचे काय?  असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

शहराच्या ठिकाणी शासकीय रुग्णालय असले तर त्या ठिकाणी विविध प्रकारचे व्याधीग्रस्त नागरिक जाऊन उपचार घेऊ शकतील. परंतु सध्या वसईत अशा रुग्णालयाची वानवा आहे. वसई-विरार महापालिका स्थापन होऊन १३ वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रात एकही मोठे शासकीय सुसज्ज रुग्णालय उभारले नाही.  करोनाकाळ सुरू झाला तेव्हा पालिकेला जाग येऊन विरार येथील जीवदानी रुग्णालयाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करावे लागले होते. इतक्या वर्षांत सुसज्ज असे रुग्णालय उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न न केल्याने शहरातील अडचणी कायम आहेत.

वसईतील नागरिकांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी वसई पश्चिमेतील नवघर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाच ते सहा वर्षांचा कालावधी उलटून गेला तरीही  या रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागला नाही. तर दुसरीकडे ग्रामीण भागासह इतर भागांतील नागरिकांना सुविधा मिळाव्यात यासाठी विरार पूर्वेच्या खानिवडे येथेही ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारले जाणार आहे. २०१४ साली खानिवडे येथे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला होता. तसेच यासाठी ०.९९ हेक्टर जागेची तरतूद करण्यात आली होती. परंतु त्यात ०.१८ हेक्टर जागा ही  वन विभागाची असल्याने चार वर्षांपासून हस्तांतरण प्रक्रिया रखडली होती. मागील वर्षी जुलै महिन्यात या जागेची हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाल्याने जागेचा प्रश्न सुटला आहे. जागेचा प्रश्न सुटून वर्षभराचा कालावधी उलटून गेला तरीही अजूनही रुग्णालय उभारणीसाठी हालचाली होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

या रुग्णालयाच्या उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ३० खाटांची क्षमता लक्षात घेऊन आराखडा तयार केला आहे. व १८.८५ कोटींचे अंदाजपत्रक तयार करून आरोग्य विभागाला ऑगस्ट २०२१ मध्ये सादर केले आहे. मात्र अजूनही या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसल्याने या रुग्णालयाच्या उभारणीचे काम रखडले आहे. अशा प्रकारे रुग्णालयांच्या कामांची रखडपट्टी होत असल्याने खासगी रुग्णालयांची मात्र चांदी होऊ लागली आहे.

वसईत येणाऱ्या प्रत्येक निवडणूक काळात विविध राजकीय पक्षांची नेते मंडळी वसई-विरारमध्ये चांगले सुसज्ज असे रुग्णालय उभारू अशी घोषणा करून आश्वासने दिली जातात. मात्र काही काळ सरताच पुन्हा एकदा सर्वसामन्य नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली जातात. आता तरी हा प्रकार थांबायला हवा. दिवसेंदिवस विविध प्रकारचे आजार बळावत आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य सेवा अधिक बळकट करणे गरजेचे बनले आहे. परंतु त्या अनुषंगाने पावले उचलली जात नसल्याने अजूनही वसईच्या जनतेला सुसज्ज रुग्णालयाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

Story img Loader