नालासोपारा येथे राहणाऱ्या एका महिलेची तिच्या पतीने गळा दाबून हत्या केली. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी पतीला अटक केली आहे. आर्थिक वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नालासोपारा पश्चिम येथे यशवंत गौरव रोड वरील आनंद व्ह्यू या इमारतीत भाविक ठक्कर (२५) हा पत्नी मुन्नी ठक्कर (२२) हिच्या सोबत रहात होता. सहा महिन्यापूर्वी त्यांचे लग्न झाले होते. शनिवारी रात्री मुन्नी ने पतीकडे २० हजार रुपये मागितले होते. मात्र भविकने पैसे देण्यास नकार दिला. त्यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला आणि दोघांमध्ये बाचाबाची झाली. रागाच्या भरात पतीने मुन्नीची गळा दाबून हत्या केली.

आर्थिक वादातून ही हत्या झाली असून आम्ही आरोपी पतीला अटक केली आहे अशी माहिती नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी दिली.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai wife killed for twenty thousand rupees amy