वसई : नव्याने बांधण्यात आलेल्या नवीन वर्सोवा पुलावर पडलेल्या खड्डे प्रकरणात अद्याप ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत. दुसरीकडे वर्सोवा पूल तसेच मुंबई- अहमदाबाद महामार्गावर पुन्हा खड्डे पडल्याने वाहनचालकांना खड्डय़ातून वाहने चालवताना हाल होतात. मुंबई-अहमदाबाद यांना जोडणाऱ्या वर्सोवा खाडीवरील नवीन पूल तयार करण्यात आला आहे. २८ मार्च २०२३ या पुलावरील एकमार्गीला वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र अवघ्या तीन महिन्यांतच या मार्गावर विविध ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत, तर काही ठिकाणी अक्षरश: सळया दिसू लागल्या आहेत. जूनमध्ये झालेल्या आढावा बैठकीत नवीन पुलावर झालेल्या खड्डय़ांबद्दल खासदार राजेंद्र गावित यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. तसेच एक आठवडय़ात संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महामार्ग प्राधिकरणाला दिले होते; परंतु अद्याप गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ठेकेदाराला वाचविण्यात प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत  आहे. दरम्यान, मंगळवारी वर्सोवा पुलावर पुन्हा असंख्य खड्डे पडल्याने वाहतूक मंदावली होती.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Versova bridge problem of potholes on highway no case has been registered against the contractor yet ysh