वसई – स्वाभिमानी वसईकर या सामाजिक संघटनेचे संस्थापक तसेच प्रसिद्ध ख्रिस्ती गायक, संगितकार तसेच व्हिक्टर उर्फ विजय मच्याडो यांचे बुधवारी कर्करोगाने निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

व्हिक्टर उर्फ विजय मच्याडो हे विरार पश्चिमेच्या नंदाखाल येथे रहात होते. वसईच्या सामाजिक चळवळीत मोठे योगदान असेलली स्वाभिमानी वसईकर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असलेले व्हिक्टर उर्फ विजय मच्याडो हे लढाऊ नेतृत्व म्हणून प्रसिद्ध होते. २००९ मध्ये वसईत गाजलेल्या जनआंदोलनात त्यांचा मोठा वाटा होता. या आंदोलनाच्या माध्यमातून ते घराघरात पोहोचले होते. स्वाभिमानी वसईकर या संस्थेची स्थापना करून त्यांनी वसईत विविध आंदोलने गाजवली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना कर्करोगाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना बुधवारी त्यांचे निधन झाले.

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Amit Shah Malkapur, Chainsukh sancheti campaign,
मविआ म्हणजे विकास विरोधी आघाडी, गृहमंत्री अमित शहांचे टीकास्त्र; लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र

हेही वाचा – वसई : रुग्णांना रक्त देण्याची जबाबदारी रुग्णालयांचीच, पालिकेकडून सर्व खासगी रुग्णालयांना नोटीसा

हेही वाचा – रेल्वेत वाढती गुन्हेगारी; मीरारोड वैतरणा स्थानकादरम्यान वर्षभरात १०९८ गुन्हे

व्हिक्टर मच्याडो ख्रिस्ती उपासनेचे संगित विषारद होते. त्यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली गाणी मराठी ख्रिस्ती घराघरात लोकप्रिय आहेत. बुधवारी संध्याकाळी नंदाखाल चर्च परिसरात त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले. यावेळी झालेल्या शोकसभेत माजी आमदार विवेक पंडित, प्रसिद्ध कवी सायमन मार्टीन, डॉमनिका डॉबरे, पायस मच्याडो, माजी नगरसेवक हार्दिक राऊत आदी उपस्थित होते. संगित क्षेत्राबरोबर चळवळीचे उमदे नेतृत्व हरपले, अशा शब्दात सायमन मार्टीन यांनी शोक व्यक्त केला.