लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई- वसई विरार महापालिकेचे दोन अभियंते एका पबमध्ये तरूणींसमवेत नृत्य करतानाची चित्रफित सध्या वायरल झाली आहे. ही पार्टी एका भूमाफियाने आयोजित केली असल्याचा आरोप आहे. दरम्यान, या चित्रफितीच्या आधारे आम्हाला राजकीय पक्षाने ब्लॅकमेल करून लाखो रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप या अभियंत्यांनी केला आहे.

वसई विरार महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील दोन अभियंत्यांची एक चित्रफित सध्या समाजमाध्यमावर वायरल झाली आहे. पेल्हार प्रभागातील अभिनयंता भीम रेड्डी आणि चंदनसार प्रभागातील अभियंता मिलिंद शिरसाट अशी या दोन अभियंत्यांची नावे आहे. ते वसईतील ‘पंखा फास्ट’ या पब मध्ये तरुणींसोबत नृत्य करत असतानाही ही चित्रफित आहे. त्यांच्यासोबत अनधिकृत बांधकामे कऱणारा एक भूमाफिया देखील आहे. या चित्रफितीने सध्या खळबळ उडाली आहे. ज्यांच्या विरोधात कारवाई करायची त्यांच्याच बरोबर पार्टी करत असल्याने या अभियंत्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तरुणींसोबत अश्लील नृत्य करत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पालिका सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. भूमाफियांसमवेत पार्टीत जाणे, पालिकेची प्रतिमा मलिन करणे या कारणामुळे त्यांचे निलंबन होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-शहरबात : २९ गावांच्या दीर्घकालीन संघर्षाचा अंत…

चित्रफितीच्या आधारे ब्लॅकमेल करून लाखोंची खंडणी

मात्र या अभियंत्यांनी सांगितलेले कारण धक्कादायक आहे. ही चित्रफित ८ महिने जुनी आहे. आम्ही रात्री ११ च्या सुमारास त्या पबमध्ये गेलो होतो. चित्रफितीत असलेल्या तरूणी तरूणी आमच्या मैत्रीणी आहेत असे अभियंता भीम रेड्डी आणि मिलिंद शिरसाट यांनी सांगितले. मात्र एका राजकीय पक्षाने आमची चोरून चित्रफित काढली आणि आम्हाला त्या आधारे ब्लॅकमेल करून खंडणी उकळली असे रेड्डी यांनी सांगितले. बदनामी नको म्हणून आम्ही पैसे दिल्याची कबुली त्यांनी दिली. तो भूमाफिया योगायोगाने त्या पार्टीत आला होता असे अभियंता मिलिंद शिरसाट यांनी सांगितले. आता आम्ही आणि आमच्या मैत्रीणी पोलिसांकडे खंडणी मागितल्याची तक्रार करणार आहोत, असेही या अभियंत्यांनी सांगितले.

२०१७ मध्ये देखील १२ अभिंयते झाले होते निलंबित

अभियंत्यांकडून सार्वजनिक ठिकाणी नृत्य करण्याचा प्रकार नवा नाही. २०१७ मध्ये एका वाढदिवस पार्टीत नृत्य केल्याची अशीच एक चित्रफित वायरल झाली होती. याप्रकरणी तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांनी तब्बल १२ अभियंत्यांना निलंबित केले होते. पालिकेचेच्या एका ठेका अभियंत्यानी ही पार्टी आयोजित केली होती. मात्र बिभत्स नृत्य करून पालिकेची प्रतिमा मलिन केल्याने १२ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of municipal engineers dancing in a pub goes viral alleging that land mafia organized the party mrj
Show comments