नालासोपाऱ्यामध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. नालासोपारा पूर्व येथील सेंट्रल पार्क परिसरातील रजनी अपार्टमेंटमध्ये राहणारी एक तरुणी मोबाईलवर बोलता बोलता गच्चीवरुन खाली पडली. सुदैवाने या तरुणीचे प्राण वाचले असून तिला गंभीर दुखापत झाली आहे.

या विचित्र अपघातामध्ये जखमी झालेल्या तरुणीचं नावं श्रुती भुपेश पांडे असं असून ती १९ वर्षांची आहे. श्रुती रविवारी सायंकाळी इमारतीच्या गच्चीवर मोबाईलवर बोलत होती. अचानक तिच्या हातातून मोबाईल सटकला आणि खाली पडला. मोबाईल पकडण्याच्या नदात श्रुतीचा तोल गेला आणि ती खाली पडली. इमारतीचे काम सुरु असल्याने बांधलेल्या पत्र्यांमुळे इमारतीच्याच्या पहिल्या मजल्यावरील लोखंडी ग्रीलवर श्रुती पडली.

diljit dossanj back a girl who cried in concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये रडल्याने तरुणी झाली ट्रोल, गायक बाजू घेत म्हणाला, “तुम्ही देशाच्या…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Girl hugged her mother with the help of AI
VIRAL VIDEO: ‘ती पुन्हा कधीच दिसणार नाही…’ AI च्या मदतीने आईला मारली मिठी, लेकीने शेअर केला व्हिडीओ
father daughter relation
“मुलीला तिच्या आयुष्यात वडीलाइतकं कोणीच समजू शकत नाही” पाहा बापलेकीचा हृदयस्पर्शी व्हिडीओ
a brother Holding a cockroach in his hand showed fear to his sister
झुरळ हातात पकडून बहि‍णीला दाखवली भीती; तुमच्या भावाने तुमच्याबरोबर कधी असं केलं का? पाहा Viral Video
Shocking video Year Old Boy Slaps Mother Repeatedly After Finding Her Over Drug Use
पोटच्या मुलानं आईला भररस्त्यात बेदम मारलं; कारण ऐकून नेटकरी म्हणाले बरोबर केलं; VIDEO पाहून सांगा तुम्हाला काय वाटतं
radhika deshpande
“त्या व्यक्तीने मला…”, मराठी अभिनेत्रीबरोबर १६ व्या वर्षी घडलेली धक्कादायक घटना; म्हणाली, “मी त्याच्या कानाखाली दिली”

अगदीच अडगळीची जागा असल्याने या ठिकाणाहून बाहेर निघण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नसल्याने श्रुती या ठिकाणी अडकून पडली. तिने मदतासाठी आरडाओरड केल्यानंतर इमारतीमधील रहिवाशांचं तिच्याकडे लक्ष गेलं. त्यानंतर इमारतीमधील इतर रहिवाशांनी अग्निशमन विभागाला फोन करुन घडलेल्या घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचेपर्यंत या तरुणाला सोबत करण्यासाठी काही तरुण या पत्र्यावर चढले. ही तरुणी आई आणि आजीचा उल्लेख करत, ‘मला फार दुखतंय’ असं ओरडत होती. तरुणीच्या हाताला आणि पायाला मार लागल्याने तिला पत्र्यावरुन सुखरुप बाहेर काढण्यासाठी पहिल्या मजल्यावरील या पत्र्याच्या शेडजवळच्या रुमचं ग्रील तोडण्याशिवाय इतर पर्याय उपलब्ध नव्हता.

रहिवाशांकडून फोनवरुन या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वसई-विरार अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोचले. या जवानांनी स्प्रेड कटर मशीनच्या मदतीने ग्रील तोडून मुलीला बाहेर काढले व नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. या तरुणीच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे.