वसई: मुंबईमधून एलिफंटाकडे जाणाऱ्या प्रवासी बोटीचा अपघात होऊन १४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वसई विरार मधील वसई भाईंदर रोरो, पाणजू व अर्नाळा या प्रवासी वाहतूक जलमार्ग प्रवासी बोटींचे महाराष्ट्र सागरी मंडळाकडून परिक्षण केले जाणार आहे. व त्यानुसार संबंधित ठेकेदारांना सूचना केल्या जाणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वसई तालुक्यात तीन ठिकाणी जलमार्ग प्रवासी वाहतूक केली जाते. यात वसई ते भाईंदर अशी रोरो सेवा फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आली आहे. त्यातूनही दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. तर दुसरीकडे पाणजू बेटावर व अर्नाळा किल्ला बेटांवर राहत असलेल्या नागरिकांना ही प्रवासी बोटीने प्रवास करावा लागतो. मात्र नुकताच मुंबईमधून एलिफंटाकडे जाणाऱ्या निलकमल या प्रवासी बोटीला नेव्हीच्या स्पीड बोटची धडक बसून अपघात घडला यात १४ जणांचा मृत्यू झाला तर नव्वद पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले. या दुर्घटनेनंतर जलमार्गाने बोटींतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक, लाईफ जॅकेट, बोटींची देखभाल दुरुस्ती, रिंग बोयाज नसणे अशा विविध प्रश्न समोर आले आहेत.
आणखी वाचा-२९ गावांवरील सुनावणीला थंड प्रतिसाद, ३ दिवसांची मुदत वाढवली
काही ठिकाणी लाईफ जॅकेट असते मात्र प्रवासी वापरत नाही. तर काही ठिकाणी धोकादायक पद्धतीने बसवून प्रवासी वाहतूक होत असते. अशा दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी असा महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून पुन्हा एकदा वसईत प्रवासी सेवा देणाऱ्या बोटींचे परीक्षण केले जाणार आहे. त्यात बोट सुस्थितीत आहे किंवा नाही, लाईफ जॅकेट सुविधा, जास्त प्रवासी वाहतूक करू नये, जलमार्ग वाहतूक प्रवासी करताना भौगोलिक स्थितीचा अंदाज, प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ज्या आवश्यक उपाययोजना अशा सर्व बाबी तपासून घेतल्या जाणार आहेत. तशा सूचना ही केल्या जाणार आहेत असे महाराष्ट्र सागरी मंडळाचे अधिकारी अविनाश पाटील यांनी सांगितले आहे. यापूर्वी सुद्धा आम्ही सूचना केल्या होत्या आता पुन्हा एकदा संबंधित ठेकेदार व बोट चालक यांना सूचना करू असेही पाटील यांनी सांगितले आहे. तर अर्नाळा येथे वाहतुकीला एकच बोट आहे त्याठिकाणी संबंधित ठेकेदाराला सूचना केल्या आहेत. आता दुसरी बोट ही घेतली जाणार आहे त्यामुळे येथील प्रवासी वाहतुकीचा भार कमी होऊन सुरळीत प्रवास होण्यास मदत होणार असल्याचे महाराष्ट्र सागरी मंडळ अधिकारी नवनीत निजाई यांनी सांगितले आहे.
यापूर्वी घडलेल्या काही प्रमुख घटना
- मार्च २०१६ मध्ये पाणजू येथे एका लग्नसमारंभासाठी गेलेल्या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोटीत चढल्याने बोट उलटून हा अपघात झाला होता. यावेळी २ जणांचा बुडून मृत्यू व २२ नागरिक जखमी झाले होते.
- फेब्रुवारी २०२४ मध्ये वसई- भाईंदरवरून वसईला येणार्या रोरो सेवेची फेरी बोट ओहोटीमुळे फेरी बोट वसई जेट्टीला धडकली होती. या धडकेमुळे प्रवाशांना हादरा बसला होता.
- २७ मे २०२४ मध्ये विरार जवळील अर्नाळा समुद्रात बांधकाम साहित्य व मजुरांना घेऊन जाणारी बोट उलटून अपघात घडला होता. या अपघातात ११ मजुरांना सुखरूप बाहेर काढले मात्र एका मजुराचा बुडून मृत्यू झाला होता.
प्रवाशांनीही सावध राहण्याचे आवाहन
अर्नाळा व पाणजू या दोन्ही बोटी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत व ठेकेदार यांच्या मार्फत चालविल्या जातात. अनेकदा प्रवासी एकाच वेळी जास्त क्षमतेने बसतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर दुसरीकडे रोरो सेवेतून प्रवास करताना लाईफ जॅकेट सारखी साधने आहेत ती काही प्रवासी सांगून घालत नाही. प्रवाशांनी सुध्दा सावध व सतर्क राहून प्रवास केला पाहिजे असे आवाहनही सागरी मंडळाने केले आहे.
आणखी वाचा-पोलिसांमधील वाद विकोपाला, नवीन पोलिसांचा बदली रद्द करण्याला विरोध
अर्नाळा जेट्टीविना प्रवाशांचे हाल सुरूच
विरारच्या अर्नाळा किल्ल्यातील नागरिकांची धोकादायक प्रवासातून सुटका व्हावी यासाठी मागील सात वर्षांपासून अर्नाळा जेट्टीचे काम सुरू आहे. मात्र अजूनही ते काम पूर्ण झाले नसल्याने येथील नागरिकांना धोकादायक व खडतर प्रवास सुरूच आहे. विरार पश्चिमेच्या भागात अर्नाळा किल्ला आहे. हे गाव एका बेटावर असल्याने येथील नागरीकांना बोटीतून ये जा करावी लागत आहेत. मात्र ये जा करताना ही सुरक्षित अशी सुविधा नसल्याने येथील नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
विरार पश्चिमेच्या अर्नाळा ते अर्नाळा किल्ला या भागातील नागरिकांना फेरीबोटीतून कराव्या लागणाऱ्या धोकादायक प्रवासातून सुटका व्हावी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे जेट्टी उभारण्याचे काम सुरू केले होते. २०१७ पासून हे काम सुरू आहे. या दोन्ही बाजूचे काम मिळून सुमारे २६ कोटी इतका निधी खर्च केला जाणार आहे. मात्र काम सुरू होऊन सात वर्षाचा कालावधी उलटून गेला तरीही हे काम अपूर्ण अवस्थेत आहे. जेट्टीचे काम पूर्ण न झाल्याने अजूनही येथील नागरिकांना फेरीबोटीतून गुडघाभर पाण्यात उतरून ये जा करावी लागत आहे. शाळकरी मुले, महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक यांची परवड होते. त्यामुळे ही जेट्टी पूर्ण होणार तरी कधी प्रश्न नागरिकांनी उपस्थित जातो.
अर्नाळा किल्ला बाजूने जेट्टी पूर्ण झाल्याचा दावा सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.मात्र त्या जेट्टीच्या भागातही प्रवासी वाहतूक बोट व्यवस्थित लागत नसल्याने आजही येथील नागरिकांना धोकादायक प्रवासाला सामोरे जावे लागत आहे.याबाबत नागपुर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात ही वसईच्या आमदार स्नेहा दुबे यांनीही सभागृहात अर्नाळा जेट्टीचा प्रश्न उपस्थित करून सुसज्ज जेट्टी उभारावी अशी मागणी केली आहे.
आणखी वाचा-मिरा भाईंदर पालिका आयुक्तांचे बनावट व्हॉट्सअप; अधिकाऱ्यांकडेच पैशांची मागणी
जेट्टीचे काम सुरूच आहे. आता किल्ला बाजूचे काम सुरू आहे. मात्र पाण्याचा भाग असल्याने त्या ठिकाणी कामात अडथळे येत आहेत. तो ही लवकरच पूर्ण केला जाईल. -राजाराम गोसावी, मुख्य अभियंता महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई
एकमेव बोटीचा आधार
अर्नाळा ते अर्नाळा किल्ला असा प्रवास करण्यासाठी एकच बोट आहे. ती बोट ग्रामपंचायत यांच्या मार्फत चालविली जात आहे. मात्र तेथील नागरिकांना प्रवास करताना काही वेळा जास्त प्रवासी बसवून चालविली जाते. तर वेळेच्या कारणामुळे काही नाईलाजाने प्रवाशांना त्यात बसून जावे लागते. यासाठी आणखीन एका नवीन बोटीची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सागरी मंडळाने सांगितले आहे.