वसई : विरारच्या चिखलडोंगरी गावातून जात पंचायत बरखास्त झाल्याने गावातून बहिष्कृत केलेले १३ ग्रामस्थ अखेर गावात परतले आहे. गावात आता कसलाही त्रास नाही. अतिशय मोकळं वातावरण असून कसलीच भीती नाही अशी प्रतिक्रिया या ग्रासम्थांनी दिली.विरारच्या चिखलडोंगरी गावात हिंदू मागेला समाज राहतो. पूर्वापार परंपरेनुसार गावात जात पंचायत कार्यरत होती. २०१७ मध्ये जात पंचायचीविरोधात सामाजिक बहिष्काराचा कायदा करून तो बेकायेदशीर ठरिवण्यात आल्यानंतरही जात पंचायत अस्तित्वात होती. क्षुल्लक कारणांवरून ग्रामस्थांना २५ हजार ते ५० हजारांपर्यंतचा दंड आकारला जात होता. जात पंतायचीचे स्वयंघोषित पंच गावातील लोकांवर दहशत गाजवत होते. दंड न भरल्यास बहिष्कृत करून वाळीत टाकले जात होते. ८ नोव्हेंबर पासून लोकसत्ताने या प्रकरणाचा पाठपुरावा करून हा प्रकार समोर आणला होता. त्यानंतर १७ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. अखेर गावात सभा घेऊन जात पंचायत रद्द करण्याची घोषणा करण्यात आली होती. याशिवाय ज्यांच्यातडून दंड आकारला गेला त्यांना तो परत करण्यात आला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा