वसई– व्हिडियो गेमच्या नावाखाली सुरू असलेला जुगार अड्डा विरार पोलिसांनी उध्दवस्त केला आहे. याप्रकरणी एकूण ५२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या वर्षातील जुगारावरील ही सर्वात मोठी कारवाई आहे. विरार पश्चिमेच्या वर्तक रोड वरील चोरघे वाडीत असेलल्या जीवन बिल्डिंगच्या आवारात जुगार सुरू असल्याची माहिती विरार पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिासंनी छापा टाकला असता तेथे तीन पत्त्यांचा जुगार सुरू असल्याचे आढळून आले. शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक, व्यापारी या वेळी जुगार खेळताना आढळले.

हेही वाचा >>> वसईत ६ दुचाकी आगीत जळून खाक, अचानाक दुचाकींमध्ये आग लागण्याची दुसरी घटना

Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Nagpur Mahanagarapalika Bharti 2025: total 245 vacancy available for these posts Nagpur Mahanagarpalika Bharti Form Apply
नागपूर महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; १ लाख २२ हजारांपर्यंत मिळणार पगार; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?
A photo representing gold investment.
Gold Investment : सोने गुंतवणूकदारांची चांदी, २०२४ मध्ये मिळवला २७ टक्के परतावा; भविष्यातही सोने चकाकणार
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई
Shop owner advertise poster outside shop for customers goes viral on social media
PHOTO:”कृतज्ञता आयुष्य सुंदर बनवते” दुकान मालकानं ग्राहकांसाठी लावली अशी पाटी की होऊ लागली गर्दी; वाचून तुम्हीही कराल कौतुक
loksatta lokrang Andhra Pradesh and Telangana have a rich tradition of chess
आदर्श घ्यावा असा…

पोलिसांनी जागा मालक जनार्दन राऊत, व्यवस्थापक धरम संघवी जुगार चालविणारा नितीन गोसावी यांच्यासह जुगार चालविणारे आणि जुगार खेळण्यासाठी आलेल्या एकूण ५२ जणांवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४, ५ सह  कलम २८३, १८८, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना कलम ४१(अ) (१) अन्वये नोटीस बजावण्यात आल्याचा माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली. घटनास्थळावरून पोलिसांनी मोबाईल फोन, फोन, चार्जर, टिव्ही सेटअप, रोख रक्मक, वह्या, गणकयंत्र (कॅल्क्युलेटर) पट्टी, वायर आदी मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींना नोटीस बजावली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राणे यांनी दिली.

Story img Loader