वसईत मोबाईल खेळण्याच्या नादात एका साडेतीन वर्षीय मुलीचा तोल जाऊन इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. माणिकपूर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसईच्या पश्चिमेला असलेल्या अग्रवाल कॉम्प्लेक्स मधील रेजन्सी वीला या इमारतीत आज (शुक्रवार) सकाळी सात वाजेच्या दरम्यान घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेया महाजन असे या मुलीचे नाव असून ती मोबाईलवर खेळत असताना बालकनीत गेली आणि तिच्या हातात मोबाईल खाली पडल्याने तो मोबाईल उचलण्यासाठी ती बालकानीच्या रेलिंगवर चढली आणि तिचा तोल जावून ती सातव्या मजल्यावरून खाली पडली तिच्या मानेला जबर मार लागण्याने तिचा मृत्यू झाला.

इमारतीतील रहिवाश्यांनी माहिती दिली की, सात वाजण्याच्या सुमारास श्रेयाची आई तिच्या मोठ्या बहिणीला शाळेत सोडण्यासाठी गेली असताना श्रेया घरात एकटीच झोपली होती. पण ती अचानक उठली आणि मोबाईलशी खेळू लागली. मोबाईलवर खेळताना ती बालकनी मध्ये आली होती, यावेळी ही घटना घडली.

सदर घटनेवरून पुन्हा एकदा इमारतींच्या सुरक्षितेचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. कारण सात मजली असतानाही या इमारतीला बाल्कनी मध्ये पूर्ण ग्रील नव्हती, यामुळे ही मुलगी या ग्रील मध्ये चढली आणि तिचा तोल जाऊन ही घटना घडली. जर सुरक्षतेच्या दृष्टीने ही ग्रील (रेलिंग) पूर्ण असती तर श्रेयाचा जीव वाचला असता.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virar three and a half year old girl died after falling from the seventh floor while playing mobile msr