लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

वसई : विरारच्या विवांता हॉटेल मध्ये १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या नोटा वाटप प्रकरणानंतर तुळींज पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. परदेशी नागरिकाला हॉटेल मध्ये वास्तव्य असूनही त्याची माहिती न दिल्याबद्दल हॉटेल मालकावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मारहाण प्रकरणात ४ जणांना अटक करण्यात आली आहे. मारहाण, बेकायदेशीर प्रवेश आदी प्रकरणात एकूण ५५ जणांची नावे निष्पन्न करण्यात आली असून ३० जणांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत.

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
50 lakh fake notes seized in Mira Road vasai news
मिरा रोड मध्ये ५० लाखांच्या बनावट नोटा जप्त; गुजराथ मधील तरुणाला अटक
government contractor killed over two crores extortion money
दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून; ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक; मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात
court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला

मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे मंगळवार १९ नोव्हेंबर रोजी विरारच्या विवांता हॉटेल मध्ये नोटा वाटप आरोपाचे नाट्य रंगले होते. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे मतदारांना नोटांचे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यानी हॉटेल मध्ये प्रवेश करून गोंधळ घातला होता. यावेळी तावडे यांना साडेचार तास डांबून ठेवण्यात आले होते. पैसे वाटप करून मतदारांना लाच देणे, प्रचाराचा कालावधी संपल्यानंतरही ४८ तासात मतदारसंघात बेकायदेशी प्रवेश करून सभा घेणे, पत्रकार परिषद घेणे तसेच मारहाण करणे याप्रकरणी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आणखी वाचा-Vasai Election Result 2024: वसईत स्नेहा दुबे- पंडित ठरल्या जायंट किलर; अटीतटीच्या लढतीत ठाकूरांचा पराभव

मंगळवारी तुळींज पोलिसांनी हॉटेलचालकावर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. हॉटेलच्या खोली क्रमांक ४१५ मध्ये अमेरिकन नागरिक वास्तव्यासाठी आला होता. मात्र त्याची माहिती ‘सी’ अर्ज भरून स्थानिक पोलिसांना कळविण्यात आली नाही. याप्रकरणी विवांता हॉटेलचा व्यवस्थापक सोनू झा (२६) चालक सुरेश शेट्टी आणि रत्नाकर शेट्टी यांच्याविरोधात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (१) (२) अन्वये तुळीज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मागील आठवड्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांना प्रचाराचा कालावधी संपला असतानाही बेकायदेशीरित्या हॉटेल वापरण्यास दिल्याप्रकरणी हॉटेलचे चालक आणि मालक रत्नाकर महालिंगा शेट्टी, सुरेश महाबळ शेट्टी, ज्योती जाधव, हेमंत जाधव आणि अन्य भागिदारांविरोधात लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१ च्या कलम १२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता

मारहाण प्रकरणी ४ जणांना अटक

भाजपचे नेते पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बविआचे कार्यकर्ते विवांता हॉटेलमध्ये शिरले होते. यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी मोहसिन शेख, हिदायद याकूब मेनन, विशाल जाधव आणि मुझाहिद शेख या चौघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण ५५ जणांची ओळख पटविण्यात आली आहे. त्यापैकी ३० जणांना नोटिसा पाठविण्यात आल्याची माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांनी दिली.