वसई: Unauthorized Resort In Virar विरार जवळील नवापूर येथील सेव्हन सी बीच रिसॉर्टमध्ये जमावाकडून झालेल्या मारहाणीत ठाण्यातील शिवसेना नेत्याच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याने त्यावर सोमवारी महापालिका व महसूल यांची संयुक्त कारवाई करीत रिसॉर्टमधील बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> वसई: जमावाच्या हल्ल्यात शिवसेना नेत्याच्या मुलाचा मृत्यू

शिवसेनेचे ठाण्याचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे पुत्र मिलिंद मोरे आणि कुटुंबीय सहलीनिमित्ताने नवापूर येथील सेव्हन सी बीच रिसॉर्टमध्ये आले होते. त्यावेळी वाहनांची धडक लागल्याने रिक्षाचालकाशी त्यांचा वाद झाला होता. त्या वेळी रिक्षाचालकाने जमाव जमवून त्यांना मारहाण केली होती. त्यातूनच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा याबाबत कारवाई करण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत. सेव्हन सी बीच रिसॉर्ट अनधिकृत असल्याचे समोर आल्यानंतर सोमवारी वसई विरार  महापालिका व महसूल विभाग यांच्या मार्फत जेसीबीच्या साहाय्याने अनधिकृत असलेल्या रिसॉर्ट वर कारवाई करीत येथील बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे. यावेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.