विरार :  वसई-विरार महानगरपालिका पाणीपुरवठा करणाऱ्या उसगाव धरणाच्या जलवाहिन्या बदलण्यासाठी पालिकेने राज्य शासनाला नव्याने प्रस्ताव सादर केला आहे. या जलवाहिन्या जुन्या झाल्याने त्या बदलण्याचा सल्ला आयआयटीने पालिकेला दिला होता.

वसई-विरार महानगरपालिकेकडून उसगाव पाणीपुरवठा प्रकल्पातून शहराला प्रतिदिन २० दशलक्षलिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. उसगांव योजनेची मुख्य जलवाहिनी सन १९९६ मध्ये अंथरण्यात होती, तर  सूर्या टप्पा-१ योजनेची मुख्य जलवाहिनी सन २००५ मध्ये अंथरण्यात आली होती. पालिकेने २०१७ मध्ये या जलवाहिन्यांच्या संरचना लेखापरीक्षण अहवाल आणि हायड्रोलिक लेखापरीक्षण करण्यासाठी मुंबई येथील आयआयटी या संस्थेची नियुक्ती केली होती. या जलवाहिन्या १९९६ मध्ये पूर्वी अंथरल्या असल्याने त्या जीर्ण होऊन त्यांना वारंवार गळती लागत आहे. तसेच या जलवाहिन्या जमिनीच्या १० ते १५ खोल अंथरल्या आहेत. गळतीमुळे त्यांच्या दुरुस्ती करण्यासाठी मोठय़ा अडचणी येत आहेत. यामुळे या जलवाहिन्या तातडीने बदलून सदर मुख्य जलवाहिन्यांमधील प्रि- स्ट्रेस सीमेंट (ढरउ) जलवाहिन्या बदलून त्याऐवजी मृदू पोलादी (टर) जलवाहिन्या अंथरण्याबाबत आयआयटीने अहवाल दिला होता.

Executive Director of Konkan Irrigation Development Corporation approved two year plan to supply 500 million liters of daily water
भिरा’च्या पाणी प्रस्तावाला गती,शासन मंजुरीनंतर पनवेल महापालिकेचा ३४०० कोटींचा खर्च
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
nandgaon in nar par damanganga river linking project marathi news
नार-पार योजनेच्या पाण्यासाठी जनहित याचिका, समन्यायी तत्वावर वाटपासाठी जलहक्क समिती आग्रही
is it Municipalities responsible for water supply to large housing projects
मोठ्या गृहप्रकल्पांना पाणीपुरवठ्याची जबाबदारी महापालिकांची?
Ganesh Naiks talk about increased water planning after Jalpuja of Morbe Dam
“भिरा प्रकल्पाचे पाणी आणा”, मोरबे धरणाच्या जलपूजनानंतर नाईक यांचे वाढीव पाणी नियोजनाचे सूतोवाच
traffic route changes in nagpur
नागपूर : ‘लाडक्या बहिणी’च्या सुरक्षेसाठी ‘या’ मार्गांवर राहणार बंदी…
Water supply disrupted in Pune city due to interrupted power supply Pune
खंडित वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत; महावितरणपुढे महापालिका हतबल
water supply remain shut down on 30 august in bmc h west ward
Water Crisis In Mumbai : एच पश्चिम विभागात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद; पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन

त्यामुळे पालिकेने सुरुवातीला स्वत: या जलवाहिन्या बदलण्याचे ठरवले होते. पहिल्या टप्प्यात उसगाव ते मेढाफाटा, शिरसाड फाटा ते कणेर, कणेर ते पिरकुंडा, बरफ पाडा ते गडगा पाडा अशी १७.८ किलोमीटर लांबीची जलवाहिनी बदण्यात येणार होती. त्यासाठी १३ कोटी ५९ लाख ६१ हजार २९५  खर्चाची तरतूद केली होती. पण निधी नसल्याने काम थांबले होते. आता पालिकेने दुसरा टप्पा (उसगाव ते पारोळ) या शासनाच्या निधीतून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला २१ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. शासनाचा निधी उपलब्ध होताच हे काम निविदा काढून सुरू केले जाईल, अशी माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

जलवाहिन्या बदलल्यानंतर त्या वारंवार फुटण्याचे आणि गळतीचे प्रमाण थांबेल आणि शहराच्या पाणीपुरवठय़ात वाढ होईल, असा दावा पालिकेने केला आहे.

अमृत योजनेचे काम अपूर्ण

सध्या शहराला दररोज २३० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये सूर्या धरणातून २०० दशलक्ष लिटर्स, पेल्हारमधून १०, उसगाव धरणातून २० आणि पापडिखड धरणातून १ दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा केला जातो. शहराला पाणीपुरवठा कऱण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या अमृत योजना राबविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत १८ जलकुंभ उभारणे तसेच ३८४ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. मार्च २०२१ पर्यंत या योजनेचे काम पूर्ण केले जाणार होते, मात्र अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही.

पालिकेच्या जलवाहिन्या ४२ वर्षे जुन्या

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या या ४२ वर्षे जुन्या असल्याने वारंवार गळती होत आहे.  जलवाहिन्या पीव्हीसीच्या असून पाण्यातील क्षार, क्लोरीन, गाळ यामुळे या जलवाहिन्या लवकर खराब होतात. साधारण ३० वर्षांच्या आत या जलवाहिन्या बदलाने अपेक्षित होते. पण बदललेल्या नाहीत. पालिकेच्या वितरण जलवाहिन्या, उपजलवाहिन्या या शहरातील रस्त्याच्या कडेला, गटारातून, नाल्यातून जात आहेत, अनेक ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागीसुद्धा जलवाहिन्या आहेत. यामुळे  जुन्या होऊन खराब झाल्याने सातत्याने गळती होते. यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जाते. अनेक ठिकाणी या जलवाहिन्या गटारातून नेण्यात आलेल्या आहेत. गळतीमुळे गटाराचे दूषित पाणीसुद्धा त्यात वाहून जाते, यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे