वसई– विरारच्या पापडखिंड धरणात यंदाही बंदी झुगारून छटपूजेचे आयोजन करण्यात आले होते. हजारो नागरिक सुर्याला अर्ध्य देण्यासाठी धऱणाच्या पाण्यात उतरले होते. यामुळे धरणातील पिण्याचे पाणी प्रदूषीत झाले होते.विरार पुर्वेला फुलपाडा येथे पापडखिंड धरण आहे. या धरणातून विरार शहराला दररोज १ दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून या धरण परिसरात छटपुजेचे आयोजन करण्यात येते. येथे बंदी असली तरी ती डावलून छटपूजा करण्यात येते. रविवारी देखील या धरण परिसरात छटपूजा आयोजित करण्यात आली होती. हजारो नागरिक धरणाच्या पाण्यात उतरले होते. तेलाचे दिवे पाण्यात सोडण्यात आले. त्यामुळे पिण्याचे पाणी प्रदूषीत झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पापडखिंड धरणाला कुठलीही सुरक्षा व्यवस्था नाही. त्यामुळे पर्यटक आणि इतर नागरिकांकडून धरणाचे पाणी अस्वच्छ होत असते. याशिवाय बंदी मोडून नागरिक या धरण परिसरात छटपूजा करत असतात. त्यामुळे तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांनी पापडखिंड धरणातील पाणी पिण्यास वापरू नये असे आदेश दिले होते. मात्र त्यानंतही या धरणाचे पाणी पिण्यासाठी दिले जात आहे. पालिका गणेशोत्सव काळात तलावांचे प्रदूषण होऊ नये यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करत असते. परंतु छटपूजेच्या वेळेस असे काही उपक्रम राबविले जात नसल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.