भाईंदर :- भाईंदर रेल्वे स्थानकावरून सकाळी ८ वाजून २४ मिनिटांनी सुटणारी वातानुकुलीत लोकल कायम सुरू ठेवणार असल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे. ही लोकल एसी ऐवजी सर्वधारण करावी यासाठी रेल्वे प्रवाशांनी आंदोलन केले होते. मात्र प्रवाशांना दिलासा देण्यासाठी भाईंदर स्थाकातून सकाळी ८ वाजता सुटणारी सर्वसाधारण लोकल ट्रेन १२ ऐवजी १५ डब्यांची केली जाणार आहे. 

भाईंदर रेल्वे स्थानकातून दररोज सकाळी ८ वाजून २४ मिनिटांनी चर्चगेटला जाणारी लोकल ट्रेन सुटत होती. मात्र नोव्हेंबर महिन्यात ही लोकल ट्रेन वातानुकूलीत (एसी) करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांनी जोरदार विरोध केला होता. ही लोकल पुन्हा सुरू करावी यासाठी सह्यांची मोहीम घेण्यात आली. विविध राजकीय पक्षांनी यासाठी आंदोलने देखील केली होती. आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रवाशांच्या मागणी लक्षात घेऊन रेल्वेला पत्रव्यवहार करून ८.२४ ची लोकल पुन्हा सर्वसाधारण करण्याची मागणी केली होती. मात्र एसी लोकल रद्द करता येणार नसल्याचे पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त व्यवस्थापक प्रकाश बुटणी यांनी सांगितले.

1.5 thousand people committed suicide in Vasai Bhayander in 5 years
५ वर्षात वसई, भाईंदर मध्ये दिड हजार जणांच्या आत्महत्या;२०२४ मध्ये गळाफास घेऊन सर्वाधिक आत्महत्या
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
8th Pay Commission Approved by By Government
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! मोदी सरकारची आठव्या वेतन आयोगाला मंजुरी
Saif Ali Khan attacked by intruder at bandra home
अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, वांद्रेतील घरात मध्यरात्री घडली घटना
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?

हेही वाचा >>>वसईत आरटीई  प्रवेशासाठी १५३ शाळांत साडेतीन हजार जागा राखीव; प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

म्हणून वातानुकूलीत लोकल सुरू केली..

याबाबत रेल्वने लेखी स्पष्टीकरण दिले आहे. दररोज सकाळी  ७.५९ वाजता विरार वरून चर्चगेटला जाण्यासाठी एसी लोकल सुटते. मात्र त्यात गर्दी होत असल्याने भाईंदर, मिरा रोड, दहिसर स्थानकातील   प्रवाशांना त्यात चढणे अवघड होत होते. त्यामुळे भाईंदर वरून एसी लोकलची आवश्यकता होती. भाईंदर स्थानकातून सकाळी ८ ते ८. ३० दरम्यान चर्चेगेटच्या दिशेने जाण्यासाठी साधारण ९ गाड्या आहेत. त्यामुळे फक्त  ८. २४ ची एक सर्वसाधारण लोकल वातानुकुलित करण्यात आली आहे. तरी देखील प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी ८ वाजता सुटणार्‍या भाईंदर- चर्चगेट लोकलमध्ये ३ डबे वाढवून १२ ऐवजी १५ डब्यांची करण्यात आली आहे, असे पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त व्यवस्थापक प्रकाश बुटणी यांनी सांगितले.

Story img Loader