लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी
वसई- विवाहबाह्य संबंध हे आणि संशय नेहमी सुखी संसारात बाधा आणत असतात. वसईतील एक महिला अशाच संशयाची बळी ठरली. २५ वर्षांपूर्वी असलेल्या प्रेमसंबंधामुळे घरात होणार्या वादाला कंटाळून तिने आत्महत्या केली आहे.
आणखी वाचा-नितीन गडकरींच्या ठाकूरस्नेहामुळे भाजपची कोंडी; विरारमध्ये कार्यक्रम भाजपाचा, वर्चस्व ठाकूरांचे
वसई पश्चिमेच्या निर्मळ येथे राहणार्या शाम जयस्वाल (४२) याचे बबिता (४०) बरोबर २५ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. मात्र लग्नापूर्वी बबिता हिचे प्रेमसंबंध असल्याची माहिती पती शामला मिळाली. या जुन्या प्रेमसंबंधामुळे पती श्याम जयस्वाल याला सतत सशंय यायचा आणि नेहमी भांडणे व्हायची. या भांडणाला शनिवारी संध्याकाळी बबिताने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. यापूर्वी देखील तिने दोन वेळा गळफास घेऊन आत्महत्या करण्याच प्रयत्न केला होता, असे तिच्या पतीने वसई पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी वसई पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.