लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई- नालासोपारा पूर्वेच्या नगीनदास पाडा येथील बंद घरात एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. गळा चिरून तिची हत्या करण्यात आली आहे. तिच्या फरार साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.

नालासोपारा पूर्वेच्या नगीनदास पाडा येथील दत्ता निवास चाळीच्या मागे असलेल्या घरातून शुक्रवारी दुपारी दुर्गंधी येत होती. पोलिसांना पाचारण केले असता घरामध्ये राहणार्‍या महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. शीतल सावंत (२९) असे या मयत महिलेचे नाव आहे. फेब्रुवारी महिन्यापासून ती आपल्या जोडीदारासोबत लिव्ह इन मध्ये रहात होती. ४ ते ५ दिवसांपूर्वी तिची हत्या करण्यात आली असावी असा पोलिसांचा कयास आहे. आरोपीने तिचे पाय देखील कापल्याचे आढून आले आहे. तिच्या सोबत राहणार्‍या जोडीदाराचा तुळींज पोलीस शोध घेत आहेत.