लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

वसई : वसई विरार मिरा भाईंदर शहरात महिलांवरील अत्याचारात २०२३ च्या तुलनेत वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत बलात्काराचे गुन्हे ४७ ने तर विनयभंगाचे गुन्हे ७७ ने वाढ झाली आहे. या मध्ये सामूहिक बलात्कार तसेच समाजाताली प्रतिष्ठांकडून बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झाली हे विशेष.

Vasai Virar City, Vasai Virar City Rickshaw,
वसई विरार शहरात रिक्षा झाल्या उदंड, बेशिस्त रिक्षाचालकांमुळे वाहतूक कोंडी; प्रवासी नागरिक त्रस्त
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
maharashtra assembly election 2024 mla srinivas vanga not reachable
श्रीनिवास वनगा १७ तासांपासून नॉट रीचेबल… पुन्हा अज्ञातवासात गेल्याची चर्चा..
police registered murder case after body found on mumbai ahmedabad highway
तो अपघात नव्हे तर हत्या; महामार्गावरील अपघाती मृत्यूचे गूढ उकलले
Saif Ali Khan's attacker detained by Mumbai Police
Saif Ali Khan Stabbed Case: सैफ अली खानवर चाकूहल्ला करणारा सापडला? मुंबई पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात, चौकशी सुरू!
action in unique way by the mira bhayandar municipality against illegal firecrackers sellers
बेकायदेशीर फटाके विक्रेत्यांवर पालिकेची अनोखी कारवाई
On Saturday evening there was huge traffic jam problem in Nalasopara
सणासुदीला नालासोपाऱ्यात प्रचंड वाहतूक कोंडी
बहुजन विकास आघाडीला अखेर शिट्टी चिन्ह मिळाले, उच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी विविध प्रकारे उपाययोजना केल्या जात असल्या तरी अत्याचाराचे प्रमाण कमी झालेले नाही. २०२३ मध्ये वसई, भाईंदर मध्ये बलात्काराच्या ३६० आणि विनयभंगाच्या ४७७ घटना घडल्या होत्या. २०२४ मध्ये त्यात वाढ झाली आहे. २०२४ या वर्षात बलात्काराच्या ४०७ तर विनयभंगाच्या ५५५ घटना घडल्या आहेत. प्रेमाच्या जाळ्यात ओढून, फसवणूक करून, धमकावून, अश्लिल छायाचित्रांच्या आधारे ब्लॅकमेल करून बलात्कार करण्यात आले आहेत.

आणखी वाचा-वसई विरार शहरात रिक्षा झाल्या उदंड, बेशिस्त रिक्षाचालकांमुळे वाहतूक कोंडी; प्रवासी नागरिक त्रस्त

रस्त्यावरून जाणार्‍या महिलांच्या विनयभंगातही वाढ झाली आहे. छेडछाड करणे, पाठलाग करणे, अश्लील शिविगाळ करणे, अश्लील संदेश पाठवणे अशा प्रकरणातही इतर कलमांप्रमाणे विनयभंगाचे गुन्हे दाखल केले जात इंस्टाग्राम हे तरुण मुलांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे मात्र याच इन्स्टाग्रामवरून बहुतांश गुन्हे घडले आहे. शिक्षक, डॉक्टर, राजकारणी अशा प्रतिष्ठित लोकांकडूनही बलात्काराच्या घटना घडल्या आहेत.

सामूहिक बलात्काराच्या प्रमुख घटना

२ सप्टेंबर २०२४
मिरा रोड मध्ये अल्पवयीन मुलीवर तिघांचा सामूहिक बलात्कार

२३ सप्टेंबर २०२४
नालासोपार्‍यात अल्पवयीन मुलीवर अनिस शेख आणि त्याचा मित्र झियान या दोघांकडून सामूहिक बलात्कार

२३ ऑक्टोबर २०२४
१६ वर्षाच्या मुलीवर तिच्या वर्गमित्रासह दोघांना धमकावून बलात्कार केला तसेच तिची अश्लील छायाचित्रे काढून तिला धमकावले आहे.

९ सप्टेंबर २०२४
नालासोपारा पूर्वेच्या गणेश आगमन सोहळा पाहण्यासाठी गेलेल्या १० वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार

आणखी वाचा-तो अपघात नव्हे तर हत्या; महामार्गावरील अपघाती मृत्यूचे गूढ उकलले

प्रतिष्ठितांकडून बलात्कार

१२ ऑगस्ट २०२४
शिक्षक- अमित दुबे या शिक्षकाने ९ वी शिकणार्‍या १४ वर्षीय मुलीवर ५ महिन्यांपासून बलात्कार

जुलै २०२४
शिकवणी शिक्षक- विरार पूर्वेच्या मनवेल पाडा येथील प्रमोद मोर्या या ईंशात कोचिंग क्लासेस चालविणाऱ्याकडून १३ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ

२५ सप्टेंबर २०२४
डॉक्टर- नालासोपारा मधील योगेंद्र शुक्ला या डॉक्टरकडून अल्वपयीन मुलाचे ८ वर्षांपासून लैंगिक शोषण

२४ सप्टेंबर
राजकारणी- भाजपाचा वसई विरार जिल्हाउपाध्यक्ष संजू श्रीवास्तव कडून २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार

Story img Loader