लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेच्या मलनि: सारण केंद्रात पडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात नवघर पोलिस ठाण्यात अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आणखी वाचा-वसईत ‘भू प्रणाम केंद्र’ सुरू, आर्थिक लुटीला चाप; भूप्रणाम केंद्रांतर्गत ऑनलाइन सुविधा सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा

दीपेश जावळकर (३२)असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तो भाईंदरच्या न्यु गोल्डन नेस्ट येथील मलनि:सारण केंद्रात कामाला होता. दरम्यान शनिवारी रात्री दहाच्या सुमारास केंद्रातील वॉल बंद करण्यासाठी तो गेला असता त्याचा पाय घसरून १० फुल खोल पाण्याच्या टाकीत पडला. टाकीत गुडगा भर इतकेच पाणी होते. मात्र मुका मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल शवविच्छेदनानंतर डॉक्टरांनी दिला आहे. तर या बाबत गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक धीरज कोळी यांनी दिली आहे.