वसई: विरार मध्ये एका दुकानात काम करणाऱ्या तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे… शनिवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली… या हल्ल्यात प्रचिती पाटील ही तरुणी गंभीर जखमी झाली असून त्याच्यावर संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हल्लेखोर तरुणीला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे
विरार पश्चिमेच्या फलाट क्रमांक एकला लागून भास्कर कॉम्प्लेक्स नावाची इमारत आहे. या इमारतीची सुनील गुप्ता यांचे दुकान आहे. या दुकानात प्रचिती पाटील ही तरुणी काम करते. बुधवारी रात्री आठच्या सुमारास ती दुकानात काम करत असताना एक अनोळखी तरुणी दुकानात आली आणि काही काळण्याच्या आत तिने आपल्याकडील कोयत्याने प्रचितीवर हल्ला केला. यात प्रगती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी जवळच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोर तरुणीला स्थानिकांच्या मदतीने पकडून विरार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे
याबाबत माहिती देताना दुकानाचे मालक सुनील गुप्ता यांनी सांगितले की काही महिन्यापूर्वी दुकानात दोन ग्राहकांचा वाद झाला होता. त्या वादातून या तरुणीने हल्ला केला. हल्लेखोर-तरुणी याच परिसरात राहते असे त्यांनी सांगितले