लोकसत्ता वार्ताहर
भाईंदर : मिरा रोड येथील म्हाडा गृह संकुलात आयोजित नववर्षाच्या पार्टीत गाण्याचा आवाज वाढवण्यावरून झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. राजा परियार(२३) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रमाणे काशिमिरा पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे
३१ डिसेंबर रोजी रात्री नववर्षाच्या स्वागतासाठी मिरा रोडच्या म्हाडा संकुलात पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मध्यरात्री ३ च्या सुमारास स्पीकर वरील गाण्याचा आवाज वाढवण्यावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. यावेळी आशिष जाधव (२५), अमित जाधव (२३) आणि त्यांचे वडील प्रकाश जाधव (५५) तसेच अन्य जणांनी राजा परियारला लाकडी दांडक्याने डोक्याला मारहाण केली होती. तर त्याचा सहकारी विपुल राय या तरुणांच्या तोंडावर लोखंडी कड्याने मारहाण केली होती. त्यात ते दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर मुंबईच्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते.
आणखी वाचा-अल्पवयीन मुलीवर सलग दोन दिवस बलात्कार, कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान गुरुवारी राजा पररियार याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विपुल रायची देखील प्रकृती चिंताजनक आहे. काशीमिरा पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी आशिष जाधव,अमित जाधव,प्रकाश जाधव आणि प्रमोद यादव ४ जणांना अटक करण्यात आली आहे.
© The Indian Express (P) Ltd