लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई: नालासोपारा उड्डापूलावर रोहीत यादव या तरूणाच्या हत्याप्रकरणात नालासोपारा पोलिसांनी वेगाने तपास करून अवघ्या ८ तासात ३ आरोपींना अटक केली आहे. त्यातील दोन आरोपी हे मुंबई महापालिकेतील कर्मचारी आहेत. उड्डाणपूलावर दुचाकी ओव्हरेटक करताना झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आली होती

नालासोपारा पूर्वेच्या संतोष भुवन येथे राहणारा रोहित यादव (२०) हा तरूण मित्र विकेश चौधरी याच्यासह रविवारी कळंब येथे फिरण्यासाठी गेला होता. आपल्या दुचाकीवरून ते घरी परतत होते. रोहीत यादव हा त्याचा मित्र विकेशच्या दुचाकीच्या मागे बसला होता.

आणखी वाचा- पालघर: विक्रमगड तालुक्यातील ११ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सव्वाचारच्या सुमारास ते नालासोपारा उड्डाणपूलावर आले. तेथे वाहतूक कोंडी होती. यावेळी विकेशने अन्य एका दुचाकीला ओव्हरटेक करून आपली दुचाकी पुढे न्यायचा प्रयत्न केला. यामुळे त्याच्या गाडीचा आरसा त्या दुचाकीच्या आरशला लागला. याचे निमित्त होऊन वाद झाला. दुसर्‍या दुचाकीवर तीन जण होते. त्यांनी रोहित आणि विकेश चौधरी यांना ठोसाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. या मारहाणीत रोहितच्या छाती आणि पोटाला जबर मार लागला आणि तो बेशुध्द झाला. ते पाहून दुचाकीवरील तिन्ही आरोपी पसार झाले. बेशुध्दावस्थेतील रोहितला पालिकेच्या तुळींज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे रात्री ७ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

आणखी वाचा-वसई: पेट्रोल बॉम्ब हल्ला प्रकरणातील फरार आरोपीस अटक

नालासोपारा पोलिसांनी याप्रकरणी ३ अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली. सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे वरळीतून निलेश पुजारी याला अटक केली. त्यानंतर पंकज बोरिचा आणि निलेश सिंग या दोघांना नालासोपारा पूर्वेतून अटक केली. आरोपी निलेश पुजारी आणि पंकज बोरीचा हे मुंबई महापालिकेत जंतुनाशक फवारणीचे काम करतात. निलेश सिंग हा कॅटरिंगचे काम करतो. तिनही आरोपी ३० ते ३५ वर्ष वयोगटातील असून नालासोपारा येथे राहणारे आहेत. या तिघांना १५ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे, पोलीस निरीक्षक राहुल सोनावणे (गुन्हे), सहाय्यक पोलीस निरीक्षक पंडित म्हस्के, अमोल तळेकर आदींच्या पथकाने तपास करून ८ तासात आरोपींना पकडण्यात यश मिळवले.