वसई- विरार मध्ये राहणार्‍या ४८ वर्षीय शिक्षकाच्या हाताची नस कापून हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या हत्या प्रकरणात अर्नाळा सागरी पोलिसांनी २२ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.विरार पश्चिमेच्या प्रिमियर पार्क येथे राहणार्‍या नागेश सेनीगरपू (४८) हा शिक्षक रविवारी रात्री मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या दोन्ही हाताच्या नसा कापण्यात आल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रकऱणी अर्नाळा सागरी पोलिसांनी अल्फरान चांद उस्मान खान (२२) या तरुणाला अटक केली आहे. अल्फरान एका स्पा मध्ये काम करतो. तो नियमित नागेश याला भेटायला घरी जात होता. रविवारी नागेश याने त्याच्याशी शारिरीक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रागाच्या भरात त्याने नागेश यांच्या हाताच्या नसा कापून हत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली. आम्ही आरोपीला अटक केली असून त्याला २८ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी यांनी दिली.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth arrested for killing teacher in virar amy