वसई : चिंचोटी धबधब्याजवळ फिरायला गेलेल्या १८ वर्षे तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. सुमित राधेश्याम यादव असे या मुलाचे नाव असून तो मुंबईच्या विलेपार्ले येथे राहणारा आहे. यंदाच्या पावसाळ्यात वसईत झालेला हा पाचवा बळी आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावसाला सुरुवात झाली असून पर्यटक वसई विराच्या समुद्रकिनाऱ्यावर तसेच तुंगारेश्वर आणि चिंचोटी येथील धबधबे पाहण्यासाठी येत असतात. पावसाळ्यात ही ठिकाणे धोकादायक बनली असून त्यावर पोलिसांनी यापूर्वीच बंदी घातली आहे. गुरुवारी दुपारी मुंबईच्या विलेपार्ले येथे राहणारा सुमित राधेश्याम यादव हा १८ वर्षे तरुण आपल्या ४ मित्रांसोबत वसई पूर्वेच्या चिंचोटी येथील धबधब्यावर फिरायला आला होता. धबधब्याखाली असलेल्या नदीत तो पोहण्यासाठी उतरला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत बुडाला. स्थानिकांच्या मदतीने त्याला पाण्यातून वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र नदीचे पात्र खोल असल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा – वसईत ६ दुचाकी आगीत जळून खाक, अचानाक दुचाकींमध्ये आग लागण्याची दुसरी घटना

दुपारच्या सुमारास हा मुलगा डोहात पडून मरण पावला होता. आम्हाला संध्याकाळी त्याची माहिती मिळाली. आम्ही घटनास्थळावर जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि पंचनामा तसेच शवविच्छेदन करून तो कुटुंबियांच्या ताब्यात दिला, अशी माहिती नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन झिंकलवाड यांनी दिली.

हेही वाचा – विरार मध्ये भरवस्तीत जुगार अड्डा; ५२ जणांवर कारवाई, अनेक मोठ्या लोकांचा सहभाग

सुमित आपल्या मित्रांसह मंदिरात दर्शनासाठी गेला होता. त्यानंतर तो चिंचोटी येथील धबधब्यात गेला. त्याला पोहायला येत नव्हते तरी तो पाण्यात का गेला हे आम्हाला समजले नाही, अशी माहिती सुमितचा चुलत भाऊ पिंटू यादव यांनी दिली.